भारताचा दुसरा विजय
By admin | Published: January 10, 2016 04:40 AM2016-01-10T04:40:23+5:302016-01-10T04:40:23+5:30
भारताने टी-२० सराव सामन्यात विजय मिळवल्यावर शनिवारी झालेल्या एकदिवसीय सराव सामन्यातही पश्चिम आॅस्ट्रेलियावर ६४ धावांनी विजय मिळवला.
पर्थ : भारताने टी-२० सराव सामन्यात विजय मिळवल्यावर शनिवारी झालेल्या एकदिवसीय सराव सामन्यातही पश्चिम आॅस्ट्रेलियावर ६४ धावांनी विजय मिळवला. २४९ धावसंख्येचा पाठलाग करताना पश्चिम आॅस्ट्रेलियाचा संघ १८५ धावांत बाद झाला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. टी-२०मध्ये कमाल दाखवणारा शिखर धवन ४ तर विराट कोहली ७ धावांवर तंबूत परतले. पॉर्टरने या दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी संयमी खेळी केली. रोहितने ६ चौकार आणि तीन षटकांर ठोकत ६७ धावांची खेळी केली. तर रहाणेने ४१ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. राहणे बाद झाल्यानंतर सामन्यात पाच बळी घेण्याची कामगिरी करणारा पश्चिम आॅस्ट्रेलियाचा पॉर्टरनेच गुरकिरतला बाद केले. ५८ धावांची खेळी करणारा मनीष पांडेला मुडीने तंबूत परत पाठवले. अष्टपैलू रवींद्र जडेजाने २६ धावांची उपयुक्त खेळी केली. भारताचा संघ २४९ धावांवर सर्वबाद झाला.
पश्चिम आॅस्ट्रेलियाचा संघ १८५ धावांत सर्वबाद झाला. मात्र
जेक कार्डर (४५) आणि जेरॉन
मॉर्गन (५०) यांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच सतावले. जडेजाने कार्डरचा तर ऋषी धवनने मॉर्गनचा अडसर दूर केला. पश्चिम आॅस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. ४९.२ षटकांत १८५ धावा करून हा संघ तंबूत परतला.(वृत्तसंस्था)
धावफलक : भारत २४९ सर्वबाद : रोहित शर्मा झे. शॉर्ट गो. मुईरहेड ६७, शिखर धवन झे.मुईरहेड गो.पॉर्टर ४, विराट कोहली पायचित पॉर्टर ७, अजिंक्य रहाणे गो. मुईरहेड ४१, गुरकिरतसिंग झे.इंग्लिस गो.पॉर्टर ६, मनीष पांडे झे.कॉर्डर गो.मुडी ५८, महेंद्रसिंह धोनी बाद इंग्लिस गो. ओ. कॉर्नर १५, रवींद्र जडेजा झे. कॉर्डर गो. पॉर्टर २६, अक्षर पटेल नाबाद ८, ऋषी धवन धावबाद (मुडी) ०, आर. आश्विन झे. इंग्लिस गो. पॉर्टर ४ अवांतर १३. गोलंदाजी : डेव्हिड मुडी ६-१-२४-१, ओ कॉर्नर ६-०-३७-१, जेम्स मुईरहेड १०-०-५५-२, ड्र्यु पॉर्टर ९.१-०-३७-५, टर्नर ५-०-३३-०
पश्चिम आॅस्ट्रेलिया एकादश : १८५ सर्वबाद: विल्यम बोसिस्टो झे. धोनी गो. यादव १३, जेक कॉर्डर पायचित आश्विन ४५, डी आरकी शार्ट गो. आश्विन १०, निक होबस्टन झे. धोनी गो.ऋषी धवन ४, जोश इंग्लिस गो. पटेल १७, ड्र्यु पॉर्टर झे. धोनी गो. आश्विन १०, जेरॉन मॉर्गन झे. रोहित गो. धवन ५०, जेम्स मुईरहेड झे. गुरकिरत सिंग गो. जडेजा ११, डेव्हिड मुडी झे. गो. पटेल २७, मार्क टर्नर नाबाद २, लियाम ओ’ कॉर्नर झे. यादव गो. गुरकिरत सिंग ०. (अवांतर : १५) गोलंदाजी : उमेश यादव ७-०-२९-१,बरिंदर शरण ७-१-२२-०, ऋषी धवन ७-१-२८-२, रवींद्र जडेजा १०-०-३८-२, आर. आश्विन १०-१-३२-२, अक्षर पटेल ८-०-२९-२, गुरकिरत सिंग ०.२-०-१-१