बांगलादेशविरुद्ध लढतीसाठी भारतीय संघ जाहीर

By admin | Published: February 1, 2017 04:59 AM2017-02-01T04:59:15+5:302017-02-01T04:59:15+5:30

तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदला जवळजवळ सहा वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पाचारण करण्यात आले. बांगलादेशविरुद्ध ९ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हैदराबादमध्ये

India's squad for the match against Bangladesh | बांगलादेशविरुद्ध लढतीसाठी भारतीय संघ जाहीर

बांगलादेशविरुद्ध लढतीसाठी भारतीय संघ जाहीर

Next

नवी दिल्ली : तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदला जवळजवळ सहा वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पाचारण करण्यात आले. बांगलादेशविरुद्ध ९ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हैदराबादमध्ये रंगणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी मंगळवारी भारताचा १६ सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला. मुकुंदला राखीव सलामीवीर म्हणून संधी मिळाली आहे.
संघनिवडीचा विचार करता तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदला संघात पाचारण करण्यात आले असून वृद्धिमान साहाने पार्थिव पटेलचे स्थान घेतले.
मुकुंदने रणजी ट्रॉफी स्पर्धेत ७०० पेक्षा अधिक धावा फटकावित निवड समितीचे लक्ष वेधले. २०११ मध्ये इंग्लंड व वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर मुकुंदला आता संधी मिळाली. मुकुंदचा अपवाद वगळता संघात विशेष बदल नाही. दुखापतीतून सावरलेले अजिंक्य रहाणे, जयंत यादव, हार्दिक पांड्या यांना संघात स्थान मिळाले आहे. मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, आर. आश्विन, रवींद्र जडेजा अपेक्षेप्रमाणे संघात आहेत. ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार व उमेश यादव वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहेत. अतिरिक्त फिरकीपटू म्हणून मिश्राची निवड करण्यात आली आहे.(वृत्तसंस्था)

बैठकीला ६ तास विलंब
निवड समितीची बैठक जवळजवळ
सहा तास उशिराने सुरू झाली. बीसीसीआयच्या नव्या प्रशासकांनी (सीओए) सहसचिव अमिताभ चौधरी यांना बैठकीचे संचालन करण्यापासून रोखले. अनेक फोन कॉल्स व ई-मेल्सची आदानप्रदान झाल्यानंतर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी बैठकीचे संचालन केले.

भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, वृद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अभिनव मुकुंद, हार्दिक पांड्या.

Web Title: India's squad for the match against Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.