विनेश फोगाटचं ठरलं! रेल्वेतील नोकरीचा दिला राजीनामा, राजकारणात प्रवेश करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 01:46 PM2024-09-06T13:46:37+5:302024-09-06T13:47:00+5:30

विनेश फोगाटने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे.

India's star female wrestler Vinesh Phogat has resigned from the Indian Railways job | विनेश फोगाटचं ठरलं! रेल्वेतील नोकरीचा दिला राजीनामा, राजकारणात प्रवेश करणार?

विनेश फोगाटचं ठरलं! रेल्वेतील नोकरीचा दिला राजीनामा, राजकारणात प्रवेश करणार?

ऑलिम्पिकमध्ये गोल्डन कामगिरी करण्यापासून वंचित राहिलेली विनेश फोगाट... विनेशच्या रुपात भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्ण पदक मिळेल या आशेने तमाम भारतीय तिच्या खेळीवर लक्ष ठेवून होते. मात्र, अंतिम फेरीच्या दिवशी भारताला मोठा धक्का बसला अन् विनेश अपात्र ठरली. तिचे १०० ग्रॅम वजन वाढल्याने तिला किताबाची लढाई करता आली नाही. यावरुनच बरेच राजकारण रंगले, विनेश भारतात परतताच तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यात काही काँग्रेस नेत्यांचाही समावेश होता. अशातच विनेशने आता एक मोठी घोषणा करत भारतीय रेल्वेतील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. 

विनेशने सोशल मीडियावर पत्र शेअर करत म्हटले की, भारतीय रेल्वेची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय काळ आहे. मी आता रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे माझे राजीनामा पत्र सादर केले आहे. देशसेवेसाठी रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन. विनेशच्या राजीनाम्यामुळे ती आता राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीमुळे (Haryana Assembly Elections 2024) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तिकिट वाटपावरून नाराज भाजपच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करणे सुरू केले आहे. तर दुसरीकडे,  कुस्तीपटू विनेश फोगाट काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे कळते. अलीकडेच विनेश आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. 

Web Title: India's star female wrestler Vinesh Phogat has resigned from the Indian Railways job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.