विश्वचषकात भारताची मजबूत स्थिती : स्मिथ

By Admin | Published: February 29, 2016 02:37 AM2016-02-29T02:37:06+5:302016-02-29T02:37:06+5:30

भारतात आयोजित करण्यात आलेल्या टी -२० विश्वचषकात यजमान संघाची स्थिती मजबूत असल्याचे आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने म्हटले आहे.

India's strong position in the World Cup: Smith | विश्वचषकात भारताची मजबूत स्थिती : स्मिथ

विश्वचषकात भारताची मजबूत स्थिती : स्मिथ

googlenewsNext

सिडनी : भारतात आयोजित करण्यात आलेल्या टी -२० विश्वचषकात यजमान संघाची स्थिती मजबूत असल्याचे आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने म्हटले आहे.
दक्षिण अफ्रिकेविरोधात तीन आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांसाठी रवाना होण्याच्या आधी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ म्हणाला की, आगामी विश्वचषकात त्यांचा संघ जिंकण्याच्या निश्चयानेच उतरेल. मात्र, यजमान भारतीय संघाची स्थिती मजबूत आहे. टी-२० त कोणता संघ कोणत्या दिवशी चांगली कामगिरी करेल, हे सांगता येत नाही. मला वाटते की भारताला त्यांच्यात देशात पराभूत करणे कठीण राहील. टी-२० विश्वचषकात आॅस्ट्रेलियाला एकही विजेतेपद पटकावता आलेले नाही. भारताचा हा दौरा आमच्या संघासाठी कठीण राहील. मात्र, आमचा संघदेखील कमाल करू शकतो. नुकत्याच झालेल्या टी-२०मालिकेत भारताने आॅस्ट्रेलियाला ३-० ने पराभूत केले आहे. अ‍ॅरॉन फिंच दुखापतग्रस्त असल्याने स्मिथला कर्णधारपद देण्यात आले आहे. स्मिथ म्हणाला की, सध्या पहिल्या तीन-चार क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येईल, विश्वचषकापूर्वी आमच्याकडे तीन सामने आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: India's strong position in the World Cup: Smith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.