भारताचे दमदार पुनरागमन

By admin | Published: June 13, 2017 04:41 AM2017-06-13T04:41:09+5:302017-06-13T04:41:09+5:30

श्रीलंकेविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघाच्या आव्हानाला सामोरे

India's strong retreat | भारताचे दमदार पुनरागमन

भारताचे दमदार पुनरागमन

Next

- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...

श्रीलंकेविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. गेल्या लढतीतील पराभवातून सावरताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत दमदार पुनरागमन केले. प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये दडपणाखाली दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी कामगिरी ढेपाळते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. भारतीय संघ या लढतीत नव्या जोमाने खेळला. मैदानावर खेळाडूंची देहबोली, शिस्त, सुरुवातीला भुवनेश्वर व बुमराह यांचा अचूक मारा, चपळ क्षेत्ररक्षण हे बघितल्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला असल्याचे दिसून आले. विराटने आपल्या गोलंदाजांना चांगले हाताळले आणि त्यांनी कर्णधाराचा विश्वासही सार्थ ठरविला. नव्या चेंडूने मारा करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्यामुळे बॅकफूटवर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा डाव गडगडला. दोन देशांदरम्यानच्या मालिकांमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला अद्याप स्पर्धेचे कोडे मात्र सोडविता आलेले नाही. त्यांच्या रणनीतीनुसार धावा फटकावल्या गेल्या नाही, तर त्यांच्यावर दडपण येते. भारतीय गोलंदाजांनी टाकलेल्या निर्धाव षटके व चेंडूंमुळे त्यांचे समीकरण गडबडले. महत्त्वाच्या लढतीचे दडपण अनुभवी फलंदाजांवरही दिसून येते, याचे आश्चर्य वाटते. एबी डिव्हिलियर्स व डेव्हिड मिलर हे दिग्गज फलंदाज धावबाद झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने प्रतिस्पर्धी संघाला वचरढ ठरण्याची संधी बहाल केली. महत्त्वाच्या लढतीत या अनुभवी फलंदाजांनी संघाच्या स्पर्धेतील भविष्यावर प्रश्नचिन्ह लावले. भारतीय संघाने दमदार व सकारात्मक खेळ केला. या खेळपट्टीवर वेगाने धावा पटकावणे शक्य नसून येथे संयमी फलंदाजी करणे आवश्यक असल्याचे भारताच्या लवकर लक्षात आले.
गोलंदाज व क्षेत्ररक्षकांच्या चमकदार कामगिरीनंतर शिखर धवनने या जागतिक स्पर्धेत फलंदाजीतील सातत्य कायम राखले. सुरुवातीला विराटला लय गवसली नाही, पण त्याने धीरोदात्त खेळी केली. (गेमप्लॉन)


जम बसल्यानंतर त्याने फटकेबाजी केली. भारतीय क्रिकेटसाठी हा शानदार दिवस ठरला.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या लढतीतील पराभव विसरून भारतीय संघ नव्या जोमाने सज्ज झाला आहे.
एजबेस्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशला नवा उत्साह संचारलेल्या भारतीय संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
(गेमप्लॉन)

Web Title: India's strong retreat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.