भारताची दमदार विजयी सलामी, छेत्रीची कमाल-टीम इंडियाची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 07:58 AM2019-01-07T07:58:13+5:302019-01-07T07:58:43+5:30

एएफसी आशियाई चषक : थायलंडवर ४-१ ने मात

India's superb victories, Chhetri's highest-ranked team India | भारताची दमदार विजयी सलामी, छेत्रीची कमाल-टीम इंडियाची धमाल

भारताची दमदार विजयी सलामी, छेत्रीची कमाल-टीम इंडियाची धमाल

Next

अबुधाबी : एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ केला. सुनील छेत्रीच्या दोन गोलच्या जोरावर भारताने थायलंडचा ४-१ ने धुव्वा उडविला. मध्यंतराच्या १-१ अशा बरोबरीनंतर भारताने दुसऱ्या सत्रात तीन गोलचा धडाका लावला. अनिरुध थापा आणि बदली खेळाडू जेजे लालपेखलुआ यांनीही लक्ष्य साधले. छेत्रीने पहिल्या गोलसह लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याची कामगिरीही केली.

येथील अल नाह्यान स्टेडियमवर स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखालील भारताने अ गटात आघाडी घेतली. भारताने तीन गुण वसूल केले. या गटात बहारीन आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली होती. खाते सर्वप्रथम उघडण्यात भारताला यश आले. २६ व्या मिनिटाला थ्रो-इन झाल्यावर आशिक कुरुनीयन याने बॉक्समध्ये मुसंडी मारली. त्याने प्रतिस्पर्धी गोलरक्षक चातचाई बुदप्रोम याच्या दिशेने चेंडू मारला होता, पण मध्येच चेंडू थीराथोन बुनमाथन याच्या हाताला लागून उडाला. पेनल्टी क्षेत्रात हे घडल्यामुळे भारताला पेनल्टी बहाल करण्यात आली. पुढील मिनिटाला ही पेनल्टी छेत्रीने घेतली आणि नेटमध्ये मैदानालगत चेंडू अचूक मारताना बुदप्रोमला संधी अशी दिलीच नही. थायलंडने सहा मिनिटांनी बरोबरी साधली. यात बुनमाथन याने योगदान देत आधीच्या दुदैर्वी चुकीची काहीशी भरपाई केली. हालीचरण नझार्री याने चानाथीप सोंगक्रासीन याला ढकलले. त्यामुळे थायलंडला फ्री किक देण्यात आली. बुनमाथन याने डाव्या पायाने मारलेला फटका नेटसमोर गेला आणि त्यावर तिरासील डांग्डा याने अचूक हेडींग करीत भारतीय गोलरक्षक व कर्णधार गुरप्रीतसिंग संधू याला चकविले. भारताने दुसरय सत्राची सुरवात सनसनाटी केली. पहिल्याच आणि एकूण ४६ व्या मिनिटाला उदांता सिंगने उजवीकडून चाल रचली. त्याने बॉक्समध्ये आशिकला पास दिला. आशिकने छेत्रीच्या दिशेने चेंडूला मार्ग दिला. मग छेत्रीने पहिल्याच टचमध्ये लक्ष्य साधले.

सुनील छेत्रीची कमाल
सुनील छेत्रीचा खाते उघडणारा गोल ह्यमाईलस्टोनह्ण ठरला. त्याने सध्या सक्रीय असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले. त्याचा हा ६६ वा गोल आहे. त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी (६५ गोल) याला मागे टाकले. पोतुर्गालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो सर्वाधिक ८५ गोलांसह आघाडीवर आहे.

गोल कुणीही नोंदवू द्या.. जल्लोष एकसारखाच
सामन्यानंतर सुनील छेत्री म्हणाला की गोल कुणीही नोंदवला तर तो गोल नोंदवण्याचा आनंद आणि त्याचा जल्लोष हा एकसारखाच असतो. दहा वर्षांनंतर मी माज्या गोलबाबत विचार करु शकेल. गोल व्हायलाच हवेत. त्याची गरज आहे. गोल कोण करतो हे महत्वाचे नाही. तो कुणीही नोंदवला तरी त्याचा जल्लोष एकच असेल.

Web Title: India's superb victories, Chhetri's highest-ranked team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.