भारताची आज न्यूझीलंडशी गाठ
By admin | Published: July 15, 2017 12:43 AM2017-07-15T00:43:35+5:302017-07-15T00:43:35+5:30
महिला विश्वचषक क्रिकेटची उपांत्य फेरी गाठण्यासाठी आज शनिवारी न्यूझीलंडवर विजय नोंदविण्याचे आव्हान असेल.
डर्बी : सलग दोन पराभवांमुळे खचलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघापुढे महिला विश्वचषक क्रिकेटची उपांत्य फेरी गाठण्यासाठी आज शनिवारी न्यूझीलंडवर विजय नोंदविण्याचे आव्हान असेल. ‘करा किंवा मरा’ अशा सामन्यात विजय न मिळाल्यास स्पर्धेबाहेर पडण्याचा धोका आहे.
गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. पाठोपाठ चार विजय नोंदविल्यानंतर द. आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियाकडून पराभवाचे तोंड पहावे लागले होते. इंग्लंड, द. आफ्रिका तसेच गत चॅम्पियन आॅस्ट्रेलियाने आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.
अखेरच्या साखळी सामन्यात जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत धडक देईल. न्यूझीलंड संघ सात गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. मागच्या सामन्यात इंग्लंडने त्यांना ७५ धावांनी धूळ चारली.
भारताने मागच्या सामन्यात फारच संथ फलंदाजी केली. स्मृती मानधना लवकर बाद होताच मिताली-राऊत जोडी बॅकफुटवर आली. यामुळे आॅस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी वर्चस्व गाजविले होते. वन डे त ६००० धावांचा विक्रम नोंदविणाऱ्या मितालीने २० धावांसाठी ५४ चेंडू घेतले. तिने ६९ धावा केल्या खऱ्या मात्र त्यासाठी ११४ चेंडू खर्ची घातले होते. पहिल्या दोन सामन्यात धावा काढणाऱ्या मानधनाची बॅट तळपलीच नाही. तिच्यासह राऊत, मिताली आणि हरमनप्रीत यांना न्यूझीलंडविरुद्ध धावा काढाव्याच लागतील.
गोलंदाजीत झुलनने अद्याप भेदक कामगिरी केलेली नाही. फिरकीपटू दीप्ती, एकता बिश्त, हरमनप्रीत आणि पूनम यादव यांनाही बळी घ्यावे लागतील. भारताचे क्षेत्ररक्षण फारच सुमार ठरले. तीन सामन्यात खेळाडूंनी आठ झेल सोडले. द. आफ्रिकेविरुद्ध दहा धावा अधिक मोजल्या तर आॅस्ट्रेलियाविरुद्ध सहज चुका केल्या होत्या. (वृत्तसंस्था)
>अर्धशतकांचे अर्धशतक1000 धावांचा टप्पा
महिला आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण करणारी पहिली खेळाडू ठरल्यानंतर भारतीय कर्णधार मिताली राज लवकरच अर्धशतकांचे अर्धशतक पूर्ण करणारी पहिली खेळाडू ठरू शकते. त्यासाठी मितालीला केवळ एका अर्धशतकी खेळीची गरज आहे.
त्याचसोबत आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत एक हजार धावांचा टप्पा गाठणारी पाचवी महिला फलंदाज ठरण्यासाठी मितालीला केवळ २३ धावांची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्ध शनिवारी खेळल्या जाणाऱ्या ‘करा अथवा मरा’ लढतीत मितालीला हे दोन्ही विक्रम नोंदविण्याची संधी आहे. मितालीने आतापर्यंत १८३ वन-डे लढतींमध्ये १६४ डावांत ४९ अर्धशतके झळकावण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे. फॉर्मात असलेल्या भारतीय कर्णधाराला आता अर्धशतकांचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ एका अर्धशतकाची गरज आहे.
मितालीनंतर महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या यादीत इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड््सचे (४६) नाव आहे. ती या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. चार्लोटच्या नावावर ५० पेक्षा अधिक सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम आहे आणि एक अर्धशतक झळकावल्यानंतर मिताली त्या कामगिरीची बरोबरी साधेल.
>पहिल्या दोन सामन्यात धावा काढणाऱ्या मानधनाची बॅट तळपलीच नाही.
भारताने मागच्या सामन्यात फारच संथ फलंदाजी केली. स्मृती मानधना लवकर बाद होताच मिताली-राऊत जोडी बॅकफुटवर आली.
>मितालीच्या नावावर पाच शतकांची नोंद आहे. त्यामुळे मितालीने ५४ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. चार्लोटने ९ शतके झळकावली आहे. तिने ५५ वेळा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. मिताली विश्वकप स्पर्धेत एक हजार धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
आतापर्यंत केवळ चार महिला फलंदाजांना विश्वकप स्पर्धेत एक हजार धावांचा पल्ला गाठता आला आहे. त्यात न्यूझीलंडची डेबी हेकले (१५०१), इंग्लंडची जेनेट ब्रिटिन (१२९९), चार्लोट एडवडर्््स (१२३१) आणि आॅस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क (११५१) यांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या झुलन गोस्वामीने एक बळी घेतला तर विश्वकप क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याच्या डायना एडल्जीच्या भारतीय विक्रमाची बरोबरी साधता येईल.
एडल्जीने ३१ विकेट घेतल्या आहेत. झुलनव्यतिरिक्त पौर्णिमा राव व नीतू डेव्हिड यांनी प्रत्येकी ३० बळी घेतले आहेत. (वृत्तसंस्था)
>उभय संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णामूर्ती, स्मृती मानधना, मोना मेश्राम, शिखा पांडे, पूनम यादव, नुजहत परवीन, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा.
न्यूझीलंड : सूजी बेट्स (कर्णधार), एमी एस, एरिन बर्मिंघम, सोफी डिवाइन, मैडी ग्रीन, होली हडेलस्टोन, ले कास्पेरेक, एमिलिया केर, केटी मार्टिन, टी न्यूटन, कॅटी पर्किंन्स, अॅना पीटरसन, रशेल प्रीस्ट, हन्ना रोव, ली ताहुहू .