भारताचे तीन खेळाडू सुवर्णपदकाच्या शर्यतीत, शशी, अंकुशिता यांचे वर्चस्व, नेहा यादवचे कांस्यवर समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:49 AM2017-11-25T03:49:43+5:302017-11-25T03:49:59+5:30
गुवाहाटी : स्थानिक चाहत्यांचा भक्कम पाठिंबा लाभलेल्या भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीचा अडथळा सहज दूर सारताना येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
गुवाहाटी : स्थानिक चाहत्यांचा भक्कम पाठिंबा लाभलेल्या भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीचा अडथळा सहज दूर सारताना येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. कर्मवीर नवीनचंद्र बारडोलाय इन्डोअर स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य फेरीत भारतीयांनी वर्चस्व गाजविले. शशी चोप्रा आणि अंकुशिता बोरो आपापल्या प्रतिस्पर्धी बॉक्सरवर निर्विवाद गाजविले तर ज्योतीने गुणविभागणीेत सरशी साधली.
ज्योतीने कझाकिस्तानची अबद्रायमोवा झांसाया हिचा ४-१ ने पराभव केला. शशीने मंगोलियाची मोंखोर नामूनवर आणि अंकुशिताने थायलंडच्या साकसिरी थंचानोकवर प्रत्येकी ५-० असा विजय मिळवला. थेट उपांत्य फेरीत स्थान मिळाल्यानंतर ८१ किलोवरील गटात नेहा यादव कझाकस्तानच्या दिना इस्लाम्बेकोवाकडून ०-५ ने पराभूत झाली. तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीतील भारताच्या उर्वरित तीन लढती शनिवारी होतील. सुवर्णपदकासाठी रविवारी सायंकाळी लढती होतील.
फ्लायवेट प्रकारात (५१ किलो) ज्योतीने पहिल्या तीन मिनिटांत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर पूर्र्णपणे वर्चस्व गाजविल्यानंतर दुसºया फेरीत मात्र बॅकफूटवर आली. तिसºया फेरीत दोघी जिद्दीने झुंजले. पण अखेर ज्योतीने ४-१ अशी सरशी साधली.
‘ उपांत्य सामन्यात कडवे आव्हान मिळाले. तिसºया फेरीत मी स्वत:ला सावरले. अंतिम फेरीआधी एक दिवस आहे. चुकांवर तोडगा शोधून नव्या दमाने सुवर्ण पदक जिंकण्यासाठी सज्ज होणार असल्याचे विजयानंतर ज्योतीने सांगितले.