भारताचे चोख उत्तर

By admin | Published: February 23, 2017 01:07 AM2017-02-23T01:07:48+5:302017-02-23T01:07:48+5:30

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३७५ धावांना उत्तर देत भारताने १९ वर्षांखालील युवा संघाच्या दुसऱ्या कसोटीत

India's top answer | भारताचे चोख उत्तर

भारताचे चोख उत्तर

Next

नागपूर : इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३७५ धावांना उत्तर देत भारताने १९ वर्षांखालील युवा संघाच्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर बुधवारी ३ बाद १५३ अशी वाटचाल केली. सौरभ सिंग (४३) आणि कनिश सेठ हे खेळत आहेत.
जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर इंग्लंडने ५ बाद २४३ धावांवरून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. नाबाद १२४ धावांवरून पुढे खेळणाऱ्या डेलरे रॉलिन्सने आणखी १६ धावांची भर घातली तोच अनुकूल रॉयलने रॉलिन्सला त्रिफळाचित केले. डेरिल फेरारिओने जॅक्सची दांडी गुल केली. एस. लोकेश्वरने लियाम व्हाइटला शून्यावर झेलबाद केले. यानंतर अ‍ॅरोन बिअर्ड व हेन्री ब्रुक्सने ५१ धावांची भर घातली. अनुकूल रॉयने बिअर्डला (२७) पायचित केले. हेन्री ब्रुक्सने अर्धशतक ठोकले. रिषभ भगतच्या चेंडूवर हॉटनला (१२) यष्टिरक्षक लोकेश्वरने झेलबाद करताच इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला. ब्रुक्स ६० धावा (१०२ चेंडू, ९ चौकार) करून नाबाद राहिला. भारताच्या रिषभ भगत, डॅरिल फेरारिओने प्रत्येकी तीन गडी बाद केले.
अभिषेक गोस्वामी व उत्कर्ष सिंग या सलामीवीरांनी ६२ धावा फळ्यावर लावल्या. लियाम व्हॉइटच्या चेंडूवर हॅरी ब्रुकने उत्कर्ष सिंगला (१९) झेलबाद केले. गोस्वामीने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, बिअर्डने त्याचा त्रिफळा उडविला. गोस्वामीने ५८ धावा केल्या. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: India's top answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.