भारताची अव्वल जिम्नॅॅस्टिकपटू दीपा करमाकरची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:31 PM2018-02-13T23:31:23+5:302018-02-13T23:31:40+5:30
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत चौथा क्रमांक संपादन करून इतिहास रचणारी भारताची अव्वल जिम्नॅॅस्टिकपटू दीपा करमाकरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती तिचे मार्गदर्शक बिसवेश्वर नंदी यांनी वृत्तसंस्थेला दिली.
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत चौथा क्रमांक संपादन करून इतिहास रचणारी भारताची अव्वल जिम्नॅॅस्टिकपटू दीपा करमाकरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती तिचे मार्गदर्शक बिसवेश्वर नंदी यांनी वृत्तसंस्थेला दिली. ही दुखापत दीपाला गेल्या वर्षी झाली होती.
नंदी म्हणाले की, ‘राष्टÑकुल स्पर्धेसाठी सध्या दीपा तंदुरुस्त नाही. आमचे लक्ष्य तिला आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त करायचे आहे. तशी ती तंदुरुस्त आहे, पण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिला अजून थोडा कालावधी लागेल.’ २४ व्या वर्षी दीपाच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया मागील वर्षी एप्रिलमध्ये झाली होती. आता रिहॅबिलिटेशन प्रक्रिया सुरू आहे. सध्या तिने थोडा-थोडा सराव सुरू केला असल्याचेसुद्धा नंदी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)