भारताचे अव्वल स्थान डावावर

By admin | Published: February 8, 2016 03:39 AM2016-02-08T03:39:40+5:302016-02-08T03:39:40+5:30

भारताला आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत विजय मिळवणे आवश्यक आहे.

India's top position on the left | भारताचे अव्वल स्थान डावावर

भारताचे अव्वल स्थान डावावर

Next

दुबई : भारताला आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत विजय मिळवणे आवश्यक आहे.
भारताने गेल्या आठवड्यात आॅस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देताना क्रमवारीत सात स्थानांची झेप घेतली. भारताला आता टी-२० क्रिकेटमधील गतविश्वविजेत्या श्रीलंकेविरुद्ध ९ फेब्रुवारीपासून मालिका खेळायची आहे. श्रीलंकेने या मालिकेत विजय मिळवला तर त्यांना भारत व विंडीजला पिछाडीवर सोडत अव्वल स्थान पटकावण्याची संधी राहील. भारताने या मालिकेत ३-० ने विजय मिळवला तर यजमान संघाचे क्रमवारीतील अव्वल स्थान
कायम राहील आणि श्रीलंका संघाची सातव्या स्थानावर घसरण होईल. मालिकेत २-१ ने विजय मिळवला तरी भारत अव्वल स्थानावर कायम राहील, पण श्रीलंका संघ चौथ्या स्थानावर दाखल होईल. (वृत्तसंस्था)

Web Title: India's top position on the left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.