भारताची दमदार विजयी सलामी

By admin | Published: January 29, 2016 03:36 AM2016-01-29T03:36:08+5:302016-01-29T03:36:08+5:30

मुंबईकर सर्फराज खान व वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देताना आयर्लंडचा ७९ धावांनी

India's victorious opening salute | भारताची दमदार विजयी सलामी

भारताची दमदार विजयी सलामी

Next

मिरपूर : मुंबईकर सर्फराज खान व वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देताना आयर्लंडचा ७९ धावांनी धुव्वा उडवला.
शेर-ए-बांगला स्टेडियवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडने भारतीयांना प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडने भारताची १६.५ षटकांत ४ बाद ५५ अशी अवस्था केली. यानंतर सर्फराज (७४) व वॉशिंग्टन (६२) यांनी भारताला आव्हानात्मक मजल मारून दिली. या दोघांच्या जोरावर भारताने ५० षटकांत ९ बाद २६८ धावांची मजल मारली.
धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा ४९.१ षटकांत १८९ धावांत खुर्दा उडाला. राहुल बाथम याने ८ षटकांत केवळ १५ धावा देऊन ३ बळी घेतले, तर अवेश खान व महिपाल लोमरोर यांनी प्रत्येकी २ बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली. झिशान अन्सारीने एक बळी घेतला. भारतीयांनीही आयर्लंडच्या आघाडीच्या फलंदाजीला खिंडार पाडताना त्यांची १६.२ षटकांत ४ बाद ४६ अशी अवस्था केली होती. मात्र, लॉर्कन टकर व विल्यम मॅकक्लिंटॉक यांनी ११३ धावांची संथ भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार ईशान किशन, रिषभ पंत, रिकी भुई व अरमान जाफर हे स्वस्तात परतल्याने भारताने ५५ धावांत ४ गडी गमावले. यावेळी भारताला सावरताना सर्फराजने ७० चेंडूंत ७ चौकारांसह ७४ धावा फटकावल्या. त्याला पुरेपूर साथ देताना वॉशिंग्टनने ७१ चेंडूंत ३ चौकारांसह ६२ धावांची संयमी खेळी केली. तसेच, झिशानने ३६ चेंडूंत ३६ धावा काढताना २ चौकार लगावले.

Web Title: India's victorious opening salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.