आॅस्ट्रेलियावर भारताचा विजय
By admin | Published: October 17, 2015 10:22 PM2015-10-17T22:22:28+5:302015-10-17T22:22:28+5:30
गतविजेता भारताने अंतिम लीग सामन्यात आॅस्ट्रेलियाला १ -० ने पराभूत केले. अंतिम सामन्यात भारताला ब्रिटनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
जोहोर बारू : गतविजेता भारताने अंतिम लीग सामन्यात आॅस्ट्रेलियाला १ -० ने पराभूत केले. अंतिम सामन्यात भारताला ब्रिटनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या दोन वेळचा विजेता भारत तिसऱ्यांदा विजेतेपदासाठी उतरणार आहे.
भारताला पहिल्या हाफमध्ये एकही गोल करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये आॅस्ट्रेलियाने सुरुवातीला आक्रमण केले. मात्र, भारताच्या जबरदस्त खेळामुळे आॅस्ट्रेलिया बॅकफूटवर गेला. त्यातच दबाव वाढला आणि भारताला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतसिंगने यात कोणतीही चूक केली नाही. या कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले. भारताने ही आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवली. भारत या स्पर्धेत आतापर्यंत चार विजय व एका पराभवासह १२ गुण घेऊन गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे. तर, ग्रेट ब्रिटनच्या संघाने ३ विजय आणि २ ड्राँसह आतापर्यंत स्पर्धेत एकही पराभव स्वीकारलेला नाही.