१५ वर्षांनंतर परदेशी भूमीवर भारताचा विजय

By admin | Published: June 3, 2016 02:28 AM2016-06-03T02:28:39+5:302016-06-03T02:28:39+5:30

भारताने लाओसला ५६ व्या मिनिटात एकमेव गोल करत पराभूत केले. २०१९च्या एएफसी आशियाकप फुटबॉल पात्रता फेरीत १५ वर्षांनंतर भारताने विजय मिळवला आहे

India's victory over foreign countries after 15 years | १५ वर्षांनंतर परदेशी भूमीवर भारताचा विजय

१५ वर्षांनंतर परदेशी भूमीवर भारताचा विजय

Next

व्हिएनतीन (लाओस) : भारताने लाओसला ५६ व्या मिनिटात एकमेव गोल करत पराभूत केले. २०१९च्या एएफसी आशियाकप फुटबॉल पात्रता फेरीत १५ वर्षांनंतर भारताने विजय मिळवला आहे. २००१ नंतर परदेशी भूमीवर या स्पर्धेत भारताचा हा पहिला विजय आहे.
भारतीय संघाने परिस्थिती विरोधात असतानाही शानदार प्रदर्शन केले. सहा प्रमुख खेळाडू जखमी असल्याने संघासोबत नव्हते. त्यामुळे भारतीय संघाकडून फारशी आशा नव्हती. मात्र, जे. जे. लालपेखलुआने ५६ व्या मिनिटाला केलेल्या गोलने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.दुसऱ्या हाफमध्ये ११ मिनिटांनंतर उदांता सिंहने सेंटर केलेला बॉल एका डिफेंडरच्या डोक्याला लागून उसळला. जेजेने संधीचा फायदा घेत विजयी गोल केला. संघ गुवाहाटीत सात जूनला होणाऱ्या दुसऱ्या फेरीत विजय मिळवेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)

Web Title: India's victory over foreign countries after 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.