भारताची 'विराट' धावसंख्या, बांगलादेश दिवसअखेर 1 बाद 41 धावा
By Admin | Published: February 10, 2017 05:11 PM2017-02-10T17:11:51+5:302017-02-10T19:38:17+5:30
बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील बांगलादेशाचा डाव दिवसअखेर 1 बाद 41 धावांवर आटोपला. तर भारताने पहिला डाव सहा बाद 687 धावांवर घोषित करण्यात केला.
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 10 - बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील बांगलादेशाचा डाव दिवसअखेर 1 बाद 41 धावांवर आटोपला. तर भारताने फलंदाज विराट कोहलीच्या जोरावर पहिला डाव सहा बाद 687 धावांवर घोषित करण्यात केला.
बांगलादेशचा फलंदाज तामीन इक्बाल आणि मोमीनल हक धावपट्टीवर खेळत आहेत. तर बांगलादेशला पहिला धक्का भारताचा गोलंदाज उमेश यादव याने सौम्य सरकार याला बाद करुन दिला. सौम्य सरकार अवघ्या 15 धावा काढून तंबूत परतला. तामीन इक्बाल 24 आणि मोमीनल हक एका धावेवर खेळत असून बांगलादेशाच्या 14 षटकात एक बाद 41 धावा झाल्या आहेत.
याआधी भारताने या कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवल्यानंतर आज पहिला डाव सहा बाद 687 धावांवर घोषित केला. यात विराट कोहलीने (204), अजिंक्य रहाणे (82), वृद्धिमान साहा (नाबाद 106), आर, अश्विन (34) आणि रविंद्र जडेजाने नाबाद 60 धावा केल्या.