भारताचा 'विराट' विजय, उपांत्य फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2016 10:51 PM2016-03-27T22:51:50+5:302016-03-27T22:59:50+5:30

टी- २० वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात फलंदाज विराट कोहलीच्या जोरावर भारताने 'विराट' विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

India's Virat wins, semifinals in semis | भारताचा 'विराट' विजय, उपांत्य फेरीत धडक

भारताचा 'विराट' विजय, उपांत्य फेरीत धडक

Next
>
ऑनलाइन लोकमत 
मोहाली, दि. २७ -  टी- २० वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात फलंदाज विराट कोहलीच्या जोरावर भारताने 'विराट' विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना भारताने १९.१ षटकात चार बाद १६१ धावा केल्या. आक्रमक फलंदाज विराट कोहलीने या सामन्यात सर्वाधिक जास्त धावा केल्या. विराट कोहलीने ५१ चेंडूत दोन षटकार आणि नऊ चौकार लगावत नाबाद ८२ धावा केल्या. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १० चेंडूत तीन चौकार लगावत नाबाद १८ धावा केल्या. तर युवराज सिंग २१ धावांवर झेलबाद झाला. पाच षटकात ३७ धावांची भागीदारी करुन रोहित शर्मा आणि शिखर धवन ही भारताची सलामी जोडी तंबूत परतली. शिखर धवन १३ धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला. सुरेश रैना १० धावांवर झेलबाद झाला. 
भारताकडून गोलंदाज हार्दिक पांड्यांने दोन गडी बाद केले, तर युवराज सिंग, आर. अश्विन, आशिष नेहरा आणि जसप्रित बुमराह यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फलंदाज आरोन फिंचने ३४ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार लगावत ४३ धावा कुटल्या. तर, उस्मान ख्वाजा आणि एरॉन फिंचने पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची सलामी दिली. ख्वाजाला २६ धावांवर नेहराने यष्ठीपाठी धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या ७२ धावा असताना अश्विनच्या गोलंदाजीवर  धोकादायक डेव्हिड वॉर्नर पाच धावांवर यष्टीचीत झाला. ग्लेन मॅक्सवेल ३१ धावांवर बाद झाला.  त्यानंतर गोलंदाज हार्दीक पांड्याने दिला ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का देत जेम्स फॉल्कनर १0 धावांवर बाद केले. 
युवराजने पहिल्याच षटकात कर्णधार स्मिथला अवघ्या दोन धावांवर यष्टीपाठी धोनीकरवी झेलबाद करुन ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर एरॉन फिंचला ४३ धावांवर  हार्दिक पंडयाने शिखर धवनकरवी झेलबाद केले. मॅक्सवेल १३ धावांवर नाबाद असून, त्याची साथ द्यायला धोकादायक शेन वॉटसन मैदानात आला आहे. 
दरम्यान , आयसीसी टी-२० वर्ल्डकपची उपांत्यफेरी गाठण्यासाठी भारतासाठी 'करो या मरो' अशीच स्थिती होती. 
 

Web Title: India's Virat wins, semifinals in semis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.