भारताचा दणदणीत विजय

By Admin | Published: October 16, 2016 02:20 PM2016-10-16T14:20:13+5:302016-10-16T20:34:16+5:30

उमेश यादव आणि हार्दिक पांड्याच्या धारधार आणि अचूक टप्याच्या गोलंदाजीपुढे न्युझीलंडचे फलंदाज अपयशी ठरले आहेत.

India's winning victory | भारताचा दणदणीत विजय

भारताचा दणदणीत विजय

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
धर्मशाळा, दि. १६ : न्यूझीलंडने दिलेल्या 191 या माफक आव्हानाचा भारतीय फलंदाजांनी सहज पाठलाग करत 6 गडी राखून चौतीसाव्या षटकातंच दणदणीत विजय मिळवला.  भारताकडून कोहलीने सर्वाधिक नाबाद 85 धावा फटकावल्या, तर रहाणेने 33 धावांचं योगदान दिलं. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

त्यापुर्वी उमेश यादव , हार्दिक पांड्या आणि केदार जाधवच्या धारधार आणि अचूक टप्याच्या गोलंदाजीपुढे न्युझीलंडचे फलंदाज अपयशी ठरले. भारतीय गोलंदाजाच्या अचूक  माऱ्यापुढे किवींची दाणादाण उडाली . न्यूझीलंडकडून लेथम व्यतीरिक्त एकाही किवी फलंदाजाला मैदानावर तग धरता आला नाही.  लेथमने एकाकी झूंज देत नाबाद 79 धावा फटकावल्या त्या जोरावर किंवींनी भारताला विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं होतं. 

 अनुभवी उमेश यादवने टेलर आणि न्युजीलंडचा कर्णधार केन विल्मस्नला माघारी पाठवले. यादवने ७ षटकात १७ धावा देताना २ फलंदाज बाद केले. तर पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या हार्दिकने राँची(०) तर धोकादायक टेलर आणि कोरी अँडरसनला बाद केले. पांड्याने ७ षटकात ३१ धावा खर्च करताना ३ फलंदाजाला बाद केले. कामचलावू फिरकी गोलंदाज केदार जाधवने उत्कृष्ट गोलंदाजी करताना २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ३ षटकात ६ धावा देताना २ फलंदाजाला बाद केले. टेलर (०), कर्णधार केन विल्यम्सन(३), गुप्टील(१२), कोरी अँडरसन(४) आणि राँन्की ० धावावर बाद झाला.  

कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध सुरू झालेल्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या सत्रात वर्चस्व राखले आहे. कसोटी मालिकेत नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीऐवजी वन डे मालिकेत महेंद्रसिंह धोनी याच्याकडे संघाची धुरा आहे. धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धर्मशाळा येथे सुरु असलेला हा सामना भारताचा ९०० वा वनडे सामना आहे.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील तिसरे स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध ४-१ असा विजय मिळवणे आवश्यक असल्यामुळे धोनीवरील दडपणात वाढ होणे स्वाभाविक आहे. सध्या न्यूझीलंड (११३ गुण) आणि भारत (११० गुण) चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा संघ भारतात कधीच एकदिवसीय मालिका जिंकू शकलेला नाही. मागील पाचही एकदिवसीय मालिकांमध्ये त्यांनी गमावल्या आहेत. या मालिका १९८८, १९९५, १९९९ व २०१० या वर्षी झाल्या होत्या.

Web Title: India's winning victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.