भारताचा दणदणीत विजय

By admin | Published: June 27, 2017 12:54 AM2017-06-27T00:54:31+5:302017-06-27T00:54:31+5:30

पावसाने केलेल्या खेळीनंतर अजिंक्य रहाणेने (१०३) झळकावलेले दमदार शतक आणि यानंतर गोलंदाजांनी केलेला अचूक मारा

India's winning victory | भारताचा दणदणीत विजय

भारताचा दणदणीत विजय

Next

त्रिनिदाद : पावसाने केलेल्या खेळीनंतर अजिंक्य रहाणेने (१०३) झळकावलेले दमदार शतक आणि यानंतर गोलंदाजांनी केलेला अचूक मारा या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान वेस्ट इंडीजचा १०५ धावांनी पराभव केला. यासह ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला. पावसामुळे तब्बल २ तास उशिराने सुरू झालेला हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्याचा निर्णय पंचांनी घेतला.
नाणेफेक जिंकून यजमानांनी टीम इंडियाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केल्यानंतर रहाणे, कर्णधार विराट कोहली (८७) आणि शिखर धवन (६३) यांच्या जोरावर भारताने निर्धारित ४३ षटकांत ५ बाद ३१० धावांचा हिमालय उभारला. हे भलेमोठे आव्हान यजमानांना अजिबात पेलवले नाही. भारतीयांच्या अचूक माऱ्यापुढे त्यांचा डाव निर्धारित षटकात ६ बाद २०५ धावांवर थांबला. सलामीवीर शाइ होप याचा अपवाद वगळता विंडीजचा एकही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही.
विंडीजची सुरुवातच खराब झाली. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर किरोन पॉवेल याला शून्यावर बाद केले. यानंतर आपल्या पुढच्याच षटकात जेसन मोहम्मदला भोपळा न फोडू देता तंबूचा रस्ता दाखवला.
यानंतर होप - एविन लुईस (२१) यांनी ८९ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलदीप यादवने लुईसला यष्टिचीत करून विंडीजला पहिला धक्का दिला. (वृत्तसंस्था)
यानंतर अर्धशतक झळकावलेला होपही कुलदीपचीच शिकार ठरला. रविचंद्रन आश्विनने जोनाथन कार्टरला (१३) बाद केल्यानंतर पुन्हा एकदा कुलदीपने विंडीजला धक्का देताना कर्णधार होल्डरला (२९) बाद केले. यावेळी आवश्यक धावगती १५च्याही वर गेल्याने यजमानांनी पुनरागमनाचे प्रयत्न सोडले. कुलदीपने ५० धावांत ३ महत्त्वपूर्ण बळी घेत विंडीजचे कंबरडे मोडले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा रहाणे- धवन यांनी शतकी भागीदारी करून भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. धवन ५९ चेंडंूत १० चौकारांसह ६३ धावा काढून परतला. यानंतर रहाणे-कोहली यांनी डाव सावरताना विंडीजची धुलाई केली. (वृत्तसंस्था)
भारत : ४३ षटकांत ५ बाद ३१० धावा.
वेस्ट इंडीज : किएरन पॉवेल झे. धोनी गो. भुवनेश्वर ०, शाइ होप पायचीत गो. कुलदीप ८१, जेसन मोहम्मद झे. पांड्या गो. भुवनेश्वर ०, एविन लुईस यष्टिचीत धोनी गो. कुलदीप २१, जोनाथन कार्टर पायचीत गो. आश्विन १३, जेसन होल्डर यष्टिचीत धोनी गो. कुलदीप २९, रोस्टन चेस नाबाद ३३, अ‍ॅश्ले नर्स नाबाद १९. अवांतर - ९. एकूण : ४३ षटकांत ६ बाद २०५ धावा.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-१-९-२; उमेश यादव ६-०-३६-०; हार्दिक पांड्या ९-०-३२-०; रविचंद्रन आश्विन ९-०-४७-१; कुलदीप यादव ९-०-५०-३; युवराज सिंग ५-०-२५-०.

Web Title: India's winning victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.