मौका साधलाच, भारताचा आफ्रिकेवर दणदणीत विजय

By admin | Published: February 22, 2015 04:23 PM2015-02-22T16:23:16+5:302015-02-22T18:40:00+5:30

गोलंदाजांचा अचूक मारा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे वर्ल्डकपमध्ये भारताने अखेर दक्षिण आफ्रिकेचा १३० धावांनी पराभव केला.

India's winning victory over Africa | मौका साधलाच, भारताचा आफ्रिकेवर दणदणीत विजय

मौका साधलाच, भारताचा आफ्रिकेवर दणदणीत विजय

Next
>ऑनलाइन लोकमत 
मेलबर्न, दि. २२ -  गोलंदाजांचा अचूक मारा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचे ३०८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेचा डाव १७७  धावांमध्येच संपुष्टात आला. 
रविवारी वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हे संघ आमने सामने होते. भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. क्विंटन डी कॉक आणि हाशीम आमला हे सलामीवीर ४० धावांमध्येच तंबूत परतले. फाफ डू प्लेसिस ५५ धावा आणि कर्णधार ए.बी. डिव्हिलियर्सने ३० धावांची खेळी करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र डिव्हिलियर्स धावबाद झाला. त्यावेळी आफ्रिकेची स्थिती ३ बाद १०८ अशी होती. त्यानंतर एकही फलंदाज फार काळ तग धरु शकला नाही व आफ्रिकेचा डाव १७७ धावांमध्येच संपुष्टात आला. भारतातर्फे आर. अश्विनने ३, मोहित शर्मा व मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन तर रविंद्र जडेजाने एक विकेट घेतली. 
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवनची १३७ धावांची दमदार खेळी, अजिंक्य रहाणेच्या तडाखेबाज ७९ धावा आणि विराट कोहलीची ४६ धावांची खेळी या आधारे भारताने ५० षटकांत ७ गडी गमावत ३०७ धावा केल्या. सुरेश रैना, रोहित शर्मा, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा हे अपयशी ठरल्याने भारताचा डाव ३०७ धावांवर रोखण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले. आफ्रिकतर्फे मॉर्ने मॉर्कलने दोन तर इम्रान ताहीर, वॅन पार्नेल व डेल स्टेनने प्रत्येकी एक विकेट घेतली.  सामन्यात शतक ठोकणा-या शिखर धवनला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. 
विश्वचषकात भारत आणि आफ्रिकेविरोधात तीन वेळा आमने सामने आले होते. यातील तिन्ही सामन्यात आफ्रिकेचा विजय झाला होता. रविवारी भारताने आफ्रिकेची विजयी मालिका खंडीत केली.

Web Title: India's winning victory over Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.