भारताचे वर्ल्ड टीम बिलियर्डवर वर्चस्व

By admin | Published: August 16, 2014 12:06 AM2014-08-16T00:06:45+5:302014-08-16T00:06:45+5:30

पंकज अडवाणी याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारत ‘ब’ संघाने येथे पार पडलेल्या पहिल्या वर्ल्ड टीम बिलियर्ड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

India's World Team dominates Billiard | भारताचे वर्ल्ड टीम बिलियर्डवर वर्चस्व

भारताचे वर्ल्ड टीम बिलियर्डवर वर्चस्व

Next

ग्लास्गो : पंकज अडवाणी याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारत ‘ब’ संघाने येथे पार पडलेल्या पहिल्या वर्ल्ड टीम बिलियर्ड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, तर भारत ‘अ’ संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अडवाणीसह, रुपेश शाह, देवेंद्र जोशी आणि अशोक शांदील्या यांचा समावेश असलेल्या विजयी संघाने ही लढत ५-४ अशा फरकाने जिंकली. आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स अ‍ॅण्ड स्नूकर फेडरेशन (आयबीएसएफ) यांच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या विजयामुळे अडवाणी याने जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. अव्वल दहामध्ये स्थान मिळवणारा तो पहिलाच
भारतीय ठरला. या विजयाबाबत अडवाणी म्हणाला, स्वातंत्र्यदिनी भारतासाठी सुवर्ण जिंकणे, हे स्वप्नपूर्तीसारखे आहे.
बेस्ट आॅफ नऊ अशा या लढतीत अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. एक तास चाललेल्या या सामन्यात भारत ‘अ’ संघाने २-१ अशी आघाडी घेतली होती. ‘अ’ संघात आलोक कुमार, बी. भास्कर, सौरभ कोठारी आणि धु्रव सितवाला यांचा समावेश होता. या संघाला आघाडी टिकवून ठेवण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)

Web Title: India's World Team dominates Billiard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.