भारतातील युवा वर्ल्डकप भव्यदिव्य असेल : फिफा

By admin | Published: March 20, 2017 12:13 AM2017-03-20T00:13:55+5:302017-03-20T00:13:55+5:30

भारतात होणारा १७ वर्षाखालील फुटबॉल वर्ल्डकप भव्यदिव्य असेल, असे आश्वासन फिफाचे स्पर्धा प्रमुख जेमी यार्जा यांनी दिले.

India's Youth World Cup will be a grand theme: FIFA | भारतातील युवा वर्ल्डकप भव्यदिव्य असेल : फिफा

भारतातील युवा वर्ल्डकप भव्यदिव्य असेल : फिफा

Next

नवी दिल्ली : भारतात होणारा १७ वर्षाखालील फुटबॉल वर्ल्डकप भव्यदिव्य असेल, असे आश्वासन फिफाचे स्पर्धा प्रमुख जेमी यार्जा यांनी दिले. भारत आतापर्यंत सर्वात मोठ्या आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या फुटबॉल स्पर्धेची तयारी करीत आहे. ६ ते २८ आॅक्टोबर दरम्यान भारतातील सहा शहरात ही स्पर्धा होत आहे. खंडप्राय देश व सांस्कृतिकभिन्नतेमुळे आयोजनात सुरवातीला अनेक अडथळे आले, परंतु यावर आता मात करण्यात आली.
यार्जा म्हणाले की, भारत आकाराने मोठा देश आहे. शिवाय येथे प्रादेशिक भिन्नता इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की, वेगवेगळया स्तरावर अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधणे आव्हानात्मक होते. स्पर्धा स्थळे खूप अंतरावर असल्याने प्रवासही खूप करावा लागतो. परंतु आता मला खात्री आहे की, ही स्पर्धा भव्यदिव्य स्वरुपात यशस्वी होईल.’

Web Title: India's Youth World Cup will be a grand theme: FIFA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.