भारताचे झिम्बाब्वेला २५६ धावांचे आव्हान
By admin | Published: July 10, 2015 04:32 PM2015-07-10T16:32:35+5:302015-07-10T16:36:46+5:30
झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला ५० षटकात २५६ धावांचे आव्हान दिले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. १० - झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला ५० षटकात २५६ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात भारताची सुरुवात डगमऴीत झाली, अवघ्या ८७ धावांतच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर फलंदाज अंबाती रायडू आणि स्टुअर्ट बिन्नी याने संघाला सावरण्याचा प्रयत्न करत भारताची धावसंख्या भक्कम केली. त्यामुळे भारताला ५० षटकात सहा बाद २५५ धावा करता आल्या.
अंबाती रायडूने एक षटकार आणि १२ चौकार लगावत नाबाद १२४ धावा केल्या. तर अक्षर पटेलने नाबाद दोन धावा केल्या. सामन्याच्या सुरुवातीला मुरली विजय अवघी एक धाव काढून तंबूत परतला. कप्तान अजिंक्य रहाणे आणि अबांती रायडूने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. अजिंक्य रहाणेने ४९ चेंडूत ३४ धावा केल्या. त्यानंतर आलेला फलंदाज मनोज तिवारी पण लवकर तंबूत परतला, तो दोन धावांवर बाद झाला. रॉबिन उथप्पा शून्यावर धावबाद झाला, तर केदार जाधव पाच धावांवर झेलबाद झाला. स्टुअर्ट बिन्नीने चांगली कामगिरी करत ७७ धावा केल्या, मात्र त्याला गोलंदाज डोनाल्ड तिरिपानोने झेलबाद केले.
झिम्बाब्वेकडून गोलंदाज डोनाल्ड तिरिपानो आणि चामू चिभाभाला प्रत्येकी दोन विकेट्स घेतले, तर ब्रायन व्हिटोरीने एक विकेट घेतला.