भारत-पाक मालिकेसाठी आयसीसीला साकडे

By admin | Published: September 13, 2015 04:11 AM2015-09-13T04:11:30+5:302015-09-13T04:11:30+5:30

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी आपला शेजारी देश भारतासोबत क्रिकेट मालिकेच्या आयोजनाविषयीचे प्रयत्न सुरूच ठेवले असून, त्यांनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट

For the Indo-Pak series, | भारत-पाक मालिकेसाठी आयसीसीला साकडे

भारत-पाक मालिकेसाठी आयसीसीला साकडे

Next

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी आपला शेजारी देश भारतासोबत क्रिकेट मालिकेच्या आयोजनाविषयीचे प्रयत्न सुरूच ठेवले असून, त्यांनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला राजी करावे, यासाठी मध्यस्थी करण्याचा आग्रह केला.
शहरयार खान पीसीबीचे अध्यक्ष असताना २००३ ते २००६ दरम्यान दोन्ही देशांत खूप क्रिकेटचे सामने झाले; परंतु त्यांनी पद सोडल्यानंतर भारत-पाक संघांत एकाही क्रिकेट मालिकेचे आयोजन होऊ शकले नव्हते. पीसीबी अध्यक्ष आणि आयसीसी अध्यक्षांदरम्यान झालेल्या चर्चेच्या एक दिवस आधी आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनीदेखील दोन्ही देशांतील मालिकेचे महत्त्व मान्य केले होते. सुरक्षिततेच्या मुद्द्यावर दोन्ही देश समाधानी असल्यास निश्चितच चाहत्यांना दोन्ही प्रतिस्पर्धी संघांची रोमहर्षक लढत पाहावयास मिळेल. याशिवाय, द्विपक्षीय मालिका झाल्यामुळे पीसीबीलादेखील आपल्या आर्थिक स्थितीतून सावरण्यास मदत होईल, असे रिचर्डसन यांनी म्हटले होते.

आयसीसी अध्यक्ष झहीर अब्बास यांच्यासोबत शुक्रवारी गद्दाफी स्टेडियम दौऱ्यादरम्यान भारतासोबत डिसेंबरमध्ये तटस्थ स्थळी अरब अमिरात येथे द्विपक्षीय मालिकेच्या शक्यतेविषयी सविस्तर चर्चा झाली. मी आयसीसी अध्यक्षांना दोन्ही देशांतील खेळाचे संबंध चांगले होण्यासाठी तुम्ही बीसीसीआयशी चर्चा करावी आणि त्यांना राजी करण्याचे प्रयत्न करण्याचा आग्रह केला. आयसीसी अध्यक्षांसोबत झालेली चर्चा खूप सकारात्मक झाली आणि दोन्ही देशांतील क्रिकेट पुन्हा एकदा सुरू होईल, अशी आशा करतो.
- शहरयार खान, पीसीबी अध्यक्ष

Web Title: For the Indo-Pak series,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.