ऑलिम्पिक पदकासाठी पी. व्ही. सिंधूने ठेवलीय शोकेसमध्ये जागा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 03:04 AM2019-09-13T03:04:41+5:302019-09-13T06:42:52+5:30
इतरही चषकांच्या रांगेत असेल सिंधूचा हा स्वप्नवत चषक : प्रयत्नांची पराकाष्ठा करणार
मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने नुकतेच विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. रिओ ऑलिम्पिक सोडला तर तिच्याकडे जवळपास सर्वच चषक आहेत. या स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभूत झाल्याचे दु: ख तिला होते, मात्र विश्व चॅम्पियनशीपचा किताब मिळवल्यानंतर हे दु:ख हलके झाले. आता पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिकचा चषक जिंकण्याकडे सिंधूच्या नजरा आहेत त्यासाठी तिने आपल्या ट्रॉफ्रीच्या कॅबिनेटमध्ये (शोकेसमध्ये) एक जागा राखीव ठेवली आहे ती खास ऑलिम्पिक चषकासाठी.
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने बासेलमध्ये आपल्या सलग तिसºया फायनलमध्ये जपानच्या नोजोमी ओकुहाराचा २१-७, २१-७ ने पराभव करीत विश्व चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकाविले होते. या ऐतिहासिक कामगिरीपूर्वी २४ वर्षीय सिंधूने रिओ आॅलिम्पिक, विश्व चॅम्पियनशीप (२०१७, २०१८) २०१७ दुबई सिरिज फायनल्स, २०१८ राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा आणि जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
एका वृत्तसंस्थेशी दिलेल्या मुलखतीत सिंधू म्हणाली की, विश्व चॅम्पिनशीपमधील सुवर्णपदक हे आतापर्यंतच्या सर्व पराभवांना दूर नेणारे आहे. लोक माझ्यावर टीक करीत होते. फायनलमध्ये मी जिंकू शकत नाही, असे बोलले जात होते. या सर्वांना माझ्या परिने उत्तर दिले आहे. असे असले तरीही ऑलिम्पिक स्पर्धा फार वेगळी असते. रिओ आणि विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेने मला वेगळ्या आठवणी दिल्या आहेत आणि हा...एक सुवर्ण शिल्लक आहे. ते जिंकल्यानंतर त्याची माझ्या कॅबिनेटमध्ये खास जागा असेल. मी निश्चितपणे, ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकासाठी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करीन. टोकियो ऑलिम्पिक हेच माझे ध्येय आहे. ऑलिम्पिक क्वालिफिकेशन्स सुरू आहेत आणि विजय मिळवत त्यादृष्टिने पुढे जाण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.
रिओनंतर सर्व काही बदलले
२०१६ मध्ये रिओ हे माझे पहिले ऑलिम्पिक होते. तेव्हा मला जास्त लोक ओळखत नव्हते. एक खेळाडू म्हणून थोडी परिचित होते. रिओनंतर मात्र सर्व काही बदलले. आता विश्व चॅम्पियनशीपनंतर बºयाच गोष्टी घडत आहेत. मला प्रत्येक स्पर्धेतून नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रतिस्पर्धी खेळाडूजवळ माझ्याविरुद्ध खेळण्याची काही ना काही रणनिती असते ती आपल्यालाही ओळखता आली पाहिजे.
ऑलिम्पिक प्रतिस्पर्ध्यांबाबत
ड्रॉ काढल्यानंतर निश्चितपणे आघाडीचे खेळाडू हेच प्रतिस्पर्धी असतील. मी मानांकनाचा विचार करीत नाही. तुम्ही चांगला खेळ करण्याचा विचार करा. त्यावर लक्ष केंद्रित केले तर कामगिरी चांगली होईल. इतर गोष्टीकउे दुर्लक्ष करणे हेच महत्त्वाचे आहे.