अभिनव ‘सुवर्ण’वेध
By admin | Published: July 26, 2014 02:53 AM2014-07-26T02:53:40+5:302014-07-26T02:53:40+5:30
माजी ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा याने अपेक्षेनुसार कामगिरी करीत राष्ट्रकुल स्पध्रेत ‘सुवर्ण’वेध साधला. त्याने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
Next
ग्लास्गो : माजी ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा याने अपेक्षेनुसार कामगिरी करीत राष्ट्रकुल स्पध्रेत ‘सुवर्ण’वेध साधला. त्याने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तर वेटलिफ्टर संतोषी मात्साला 53 किलो वजनी गटात कांस्य मिळाले. भारताच्या खात्यात 1क् पदके जमा झाली.
वेटलिफ्टिंग गटात सुखेन डे याने भारताला दुसरे सुवर्णपदक दिले. सुखेनने सुरुवातीच्या पिछाडीनंतर जबरदस्त खेळ करून 248 किलो वजन उचलत ही गौरवास्पद कामगिरी केली.
एअर पिस्टल प्रकारात मलायका गोएल हिने रौप्य पटकावले. महिला नेमबाजीत भारताचे हे पहिले पदक आहे. तिने 197.1
गुणांची कमाई केली.
वेटलिफ्टिंग गटात महाराष्ट्राच्या गणोश माळीने 244 किलो वजन उचलून कांस्यवर कब्जा केला. त्याने स्नॅच प्रकारात 111 किलो, क्लीन अँड जर्क प्रकारात 133 किलो वजन उचलले.