घरच्या मैदानावर आर्सेनालविरुद्ध विजयाचा इरादा

By Admin | Published: April 29, 2017 12:44 AM2017-04-29T00:44:45+5:302017-04-29T00:44:45+5:30

इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेतील आपल्या संघाचे आव्हान अजूनही जिवंत आहे, असे टॉटनहॅम हॉटस्पूरचा फॉरवर्ड हॅरी केन याला वाटते.

Intention to win against Arsenal at home ground | घरच्या मैदानावर आर्सेनालविरुद्ध विजयाचा इरादा

घरच्या मैदानावर आर्सेनालविरुद्ध विजयाचा इरादा

googlenewsNext

हॅरी केनशी बातचित...
इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेतील आपल्या संघाचे आव्हान अजूनही जिवंत आहे, असे टॉटनहॅम हॉटस्पूरचा फॉरवर्ड हॅरी केन याला वाटते. म्हणूनच रविवारी लंडन येथील व्हाईट हार्ट लेन मैदानावर होणाऱ्या आर्सेनलविरुद्धच्या सामन्यासाठी ते कसून सराव करीत आहेत. चेल्सा संघाच्या ते चार गुणांनी पिछाडीवर आहेत. त्याच दिवशी चेल्साचा एव्हर्टनविरुद्ध सामना असेल. या सत्रातील आता केवळ चार सामने उरले आहेत. त्यामुळे नॉर्थ लंडन डर्बीतील सामने रंगतदार होतील. केन हा टॉप फॉर्ममध्ये आहे. केन याला संघाकडून खेळण्याचा खूप मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्याला या विजयाचे महत्त्व चांगले माहीत आहे. यासंदर्भात, हॅरी केन सोबत साधललेला संवाद...
प्रश्न : टॉटनहॅम हा अजूनही जेतेपदाच्या शर्यतीत आहे. आर्सेनलविरुद्ध घरच्या मैदानावर तू हा सामना खेळशील. त्यामुळे चांगले घडेल असे अपेक्षित आहे. त्याबद्दल...
-असे काही नाही. आमचे पाच सामने शिल्लक आहेत. प्रत्येक सामना जिंकण्याचे ध्येय आहे. चेल्सीच्या बरोबरीने यायचे असेल तर तुम्हाला सर्व सामने जिंकावे लागतील.
प्रश्न- एव्हर्टनविरुद्ध चेल्सी कसे खेळेल याकडे तुझे लक्ष असेल?
-प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी त्याकडे लक्ष ठेवणार नाही. आम्ही चेल्सीच्या कामगिरीपेक्षा आमच्या कामगिरीकडे अधिक लक्ष ठेवणार आहे. आम्हीच जिंकलो तर आम्हाला संधी आहे. आम्ही फक्त आमचा विचार करीत आहोत.
प्रश्न- आर्सेनलविरुद्धच्या सामन्यावर तुझे लक्ष लागले आहे? कारण त्यांच्याविरुद्ध तू नेहमीच स्कोअर केला आहे.
- आर्सेनलविरुद्धचा सामना किती महत्त्वाचा आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. मी त्यांच्याविरुद्ध वैयक्तिकरीत्या चांगले प्रदर्शन करत आलो आहे. यावेळी मात्र आम्हाला विजयच महत्त्वाचा आहे.
प्रश्न- एफ ए चषकातील सेमीफायनलमध्ये चेल्सीकडून ४-२ ने पराभूत झाल्यानंतर हॉटस्पूरचे बरेच चाहते चिंतेत आहेत. तो धक्कादायक पराभव होता. त्यानंतर आवठड्यानंतरचा क्रॉयस्टल पॅलेसवरचा विजय किती महत्त्वाचा होता.
- आम्हाला आश्चर्यकारक असा तो निकाल होता. प्रतिस्पर्धी संघाने जबदस्त बचाव केला होता. परंतु, आमच्याजवळही संयम आहे. आमचीही वेळ येणार याची जाण होती आणि ती आली. आम्ही करून दाखवले.
प्रश्न- ख्रिस्तीयान इरिकसेनने गोल नोंदवले. आता पुढील पाच सामन्यांत त्याची भूमिका किती महत्त्वाची असेल?
- तो विश्वस्तरीय खेळाडू आहे. आता त्याची कामगिरीही महत्त्वाची असेल. माझ्या मते, प्रत्येक जण चांगला खेळतोय. तो उत्तम विजय होता आणि आता तशाचप्रकारच्या कामगिरीची गरज आहे.
प्रश्न- तू विजेतेपद मिळवणार याचा तुला विश्वास आहे?
-बघूया. मी सांगू शकतो की आम्ही त्याच दिशेने आहोत. आम्ही चांगला शेवट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या वर्षीपेक्षा अधिक चांगले यश मिळवणार. एकंदरीत आतापर्यंत चांगले सत्र राहिले आहे.
प्रश्न- या सत्रात तू क्लबसाठी २६, देशासाठी २० गोल नोंदवले आहेस. प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक गोल नोंदवण्याचे ध्येय आहे काय? सध्या एव्हर्टनचा रोमलू लुकाकू हा चार गोलने आघाडीवर आहे त्याबाबत...
-मी खोटं बोलणार नाही. मलाही तसे आवडेल. एक स्ट्रायकर म्हणून प्रत्येकाला टॉप स्कोअररचा मान मिळवायला आवडेल. पण, हे इतके सोपे नाही. कारण, लुकाकू हा उत्कृष्ट खेळत आहे. उरलेल्या सामन्यांत मला सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन करावे लागेल. (पीएमजी)
यापुढे काय घडते ते पाहूया.
प्रश्न- चेल्सीचा दिएगो कोस्ता हा चांगल्याच फॉर्ममध्ये परतलाय. त्याने १९ गोल नोंदवले आहेत. त्याने यापेक्षा अधिक गोल नोंदवू नयेत असे तुला वाटते?
-मी तसा विचार करीत नाही. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे चेल्सीपेक्षा आम्ही आमचा विचार करतो. आमच्यासाठी उरलेली पाचही सामने महत्त्वाचे असून आम्हाला त्यात विजय मिळवावा लागेल. (पीएमजी)

Web Title: Intention to win against Arsenal at home ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.