फिट इंडिया मोहिमेंतर्गत सिंधू, छेत्री साधणार विद्यार्थ्यांसोबत संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:24 PM2020-06-24T23:24:43+5:302020-06-25T06:44:39+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे २८ जून रोजी हा संवाद टिष्ट्वटरवर लाईव्ह असणार आहे.
एस.के. गुप्ता
नवी दिल्ली : फिट इंडिया मोहिमेंतर्गत स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री हे कोरोना लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे २८ जून रोजी हा संवाद टिष्ट्वटरवर लाईव्ह असणार आहे. याच कार्यक्रमात केद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू हेदेखील सहभागी होणार आहेत.
मनुष्यबळ विकास मंत्रालयातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारता यावा यासाठी फिट इंडिया मोहिमेंतर्गत थेट संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात खेळाडू दिग्गजांकडून फिटनेसच्या टिप्स घेऊ शकतील. सिंधू बॅडमिंटनची विश्वविजेती असून, स्टार खेळाडू सुनील छेत्री हा युवा फुटबॉल चाहत्यांमध्ये फार लोकप्रिय आहे. २८ जून रोजी सकाळी ११ वाजता होणाºया या ‘लाईव्ह संवादा’त दिग्गज खेळाडूंना विचारण्यात येणारे प्रश्न विद्यार्थ्यांनी तयार ठेवावेत, असे आवाहन रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)