कुंबळे, आमरे, राजपूत यांची मुलाखत

By admin | Published: June 22, 2016 03:26 AM2016-06-22T03:26:39+5:302016-06-22T03:26:39+5:30

भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्यासह माजी खेळाडू प्रवीण आमरे आणि लालचंद राजपूत यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या तीन सदस्यीय पॅनलपुढे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदासाठी मुलाखत दिली.

Interview with Kumble, Amre, Rajput | कुंबळे, आमरे, राजपूत यांची मुलाखत

कुंबळे, आमरे, राजपूत यांची मुलाखत

Next

कोलकाता : भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्यासह माजी खेळाडू प्रवीण आमरे आणि लालचंद राजपूत यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या तीन सदस्यीय पॅनलपुढे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदासाठी मुलाखत दिली.
पॅनलमध्ये सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. सचिनने लंडन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे हे तिघांच्या सोबतीला पॅनलचे समन्वयक आहेत. भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री हे सध्या परदेशात आहेत. त्यांची मुलाखतदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होणार असल्याचे कळते. बीसीसीआयने कोचपदासाठी आपल्या वेबसाईटवर जाहिरात दिली होती. या पदासाठी देशातून आणि देशाबाहेरून एकूण ५७ अर्ज आले होते. परंतु केवळ २१ जणांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले. हे पॅनल २२ जूनपर्र्यंत अध्यक्षांकडे नावाची शिफारस करेल. २४ जूनपर्यंत उमेदवार निश्चित केला जाईल. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Interview with Kumble, Amre, Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.