अपेक्षेपूर्वीच निमंत्रण मिळाले : कमिन्स

By admin | Published: March 15, 2017 01:16 AM2017-03-15T01:16:31+5:302017-03-15T01:16:31+5:30

माझ्या अपेक्षेच्या तुलनेत कसोटी खेळण्याचे निमंत्रण लवकर मिळाले असून माझ्यासाठी हे दुसरे पदार्पण आहे, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट

Invitation received before expected: Cummins | अपेक्षेपूर्वीच निमंत्रण मिळाले : कमिन्स

अपेक्षेपूर्वीच निमंत्रण मिळाले : कमिन्स

Next

रांची : माझ्या अपेक्षेच्या तुलनेत कसोटी खेळण्याचे निमंत्रण लवकर मिळाले असून माझ्यासाठी हे दुसरे पदार्पण आहे, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने व्यक्त केली. भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कमिन्सला पाच वर्षांपेक्षा
जास्त कालावधीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीनंतर त्याला कसोटी सामना खेळायला मिळण्याची चांगली संधी आहे. त्याला दुखापतग्रस्त मिशेल स्टार्कच्या स्थानी संघात स्थान मिळाले आहे. सोमवारी कमिन्स म्हणाला, ‘एक विचार करता माझ्यासाठी हे दुसऱ्या पदार्पणाप्रमाणे आहे. पाच-सहा वर्षांत बरेच काही घडल्याप्रमाणे भासत आहे. त्यावेळच्या तुलनेत
हे दिवस तयारीसाठी चांगले
आहेत. (वृत्तसंस्था)
शारीरिकदृष्ट्या व फॉर्मचा विचार केला तर आता मी चांगला आहे. गेल्या काही दिवसांपासून मी सातत्याने खेळत आहे.’
कमिन्स पुढे म्हणाला, ‘काही बाबींचा विचार केला तर मला पहिल्या लढतीप्रमाणे भासत आहे., पण वन-डे व टी-२० मध्ये आॅस्ट्रेलिया संघाचा सदस्य असल्यामुळे दडपण जाणवत नाही. तेथील माहोल अशाच प्रकारचा असतो.’
कमिन्सने २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार पदार्पण केले होते. त्यानंतर तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याच्या मते विचार केला त्यातुलनेत बरेच लवकर कसोटी संघात परत बोलविण्यात आले.
कमिन्स पुढे म्हणाला, ‘दोन महिन्यांपूर्वी या दौऱ्यासाठी राखीव खेळाडू होतो. गोलंदाजांना अधिक गोलंदाजी करावी लागणार नसल्यामुळे ते दुखापतग्रस्त होतील, असा विचार केला नव्हता. त्यामुळे मी येथे येण्याबाबत विचार करीत नव्हतो.’
गुरुवारपासून प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राखीव खेळाडू असलेल्या जॅक्सन बर्डऐवजी कमिन्सची निवड झाली तर त्याच्यावर स्टार्कची उणीव भासू न देण्याची कठीण जबाबदारी राहणार आहे. संघासाठी योगदान देण्यास उत्सुक असल्याचे त्याने सांगितले.
कमिन्स २३ वर्षांचा असून अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल, अशी त्याला आशा होती.
कमिन्स म्हणाला, ‘मी वन-डे संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते. त्यानंतर कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने विचार करणार होतो. पण हे सर्वकाही लवकर घडले, असा मी विचार केला नव्हता.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Invitation received before expected: Cummins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.