आयओए निवडणूक; २९ पर्यंत नामांकन अर्ज दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 11:23 PM2017-11-15T23:23:55+5:302017-11-15T23:24:20+5:30
भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या(आयओए)१४ डिसेंबर रोजी होणाºया निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख २९ नोव्हेंबर आहे.
नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या(आयओए)१४ डिसेंबर रोजी होणाºया निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख २९ नोव्हेंबर आहे. महासचिव राजीव मेहता यांनी काल घोषणा करीत पुढील चार वर्षांसाठी नवे पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले.
मेहता आणि रामचंद्रन गटात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली असून रामचंद्रन हे एजीएमचे आयोजन चेन्नईत करू इच्छित होते पण त्यांना विरोध पत्करावा लागला.
पुढील ४ वर्षांसाठी जे पदाधिकारी निवडले जातील त्यात अध्यक्ष, महासचिव, कोषाध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष, आठ उपाध्यक्ष, सहा संयुक्त सचिव तसेच दहा कार्यकारी सदस्य यांच्यासह खेळाडू आयोगाचा एक प्रतिनिधी असेल. मतदान आटोपताच निकाल जाहीर होतील. भारतीय निवडणूक आयोगाचे सल्लागार एस. के. मेंदीरत्ता हे निर्वाचन अधिकारी असून निवडणूक आयोगात सेवानिवृत्त न्या. आर. एस. सोढी, एम. आर. काला आणि एस. एम. सपरा यांचा समावेश आहे. मतदार यादी २६ नोव्हेंबरला प्रकाशित होईल. ४ डिसेंबर रोजी उमेदवार यादीची छाननी केली जाईल. उमेदवार ७ डिसेंबरपर्यंत नामांकन मागे घेऊ शकतील. अंतिम यादी ८ डिसेंबरला जाहीर होईल. रामचंद्रन ६९ वर्षांचे झाले आहेत. राष्टÑीय क्रीडा संहितेअंतर्गत ७० वर्षांपर्यंतचेच उमेदवार पात्र ठरतात. ते लढण्याची शक्यता कमीच आहे. (वृत्तसंस्था)