IPL 10 - गुजरातला नमवून हैदराबादचा "प्लेऑफ"मध्ये प्रवेश
By admin | Published: May 13, 2017 04:22 PM2017-05-13T16:22:34+5:302017-05-13T19:40:50+5:30
सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गतविजेत्या हैदराबादने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 13 - आयपीएलमधील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गतविजेत्या हैदराबादने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. गुजरातने विजयासाठी दिलेले 155 धावांचे लक्ष्य हैदराबादने 19 व्या षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले.
कर्णधार डेव्हीड वॉर्नर नाबाद (69) आणि वी.शंकर नाबाद (63) यांनी शेवटपर्यंत टिकून हैदराबादचा विजय सुनिश्चित केला. दोघांनी दुस-या विकेटसाठी नाबाद 133 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी दमदार सुरुवातीनंतर गुजरातच्या 43 धावात दहा विकेट गेल्या. मोहम्मद सीराज आणि राशिद खान या जोडीने सात विकेट घेऊऩ गुजरातच्या डावाला खिंडार पाडले.
प्लेऑफ मधील स्थान निश्चित करण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला सुरुवातीलाच दोन झटके बसले होते. सलामीवीर शिखर धवन (18) आणि हेनरीक्स(4) स्वस्तात बाद झाले होते. पण डेव्हीड वॉर्नर आणि शंकरने हैदराबादला विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात लायन्सचा डाव 154 धावांवर आटोपला. इशान किशन (61) आणि स्मिथने (54) भक्कम सलामी दिली. अवघ्या दहा षटकात दोघांनी 111 धावा चोपून काढल्या. पण ही जोडी फुटल्यानंतर गुजरातचा डाव पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.