आयपीएल 10 - मुंबईपुढे दिल्लीची दाणादाण
By admin | Published: May 6, 2017 09:56 PM2017-05-06T21:56:15+5:302017-05-06T23:19:47+5:30
लँडल सिमॉन्स आणि कायरन पोलार्डच्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने आयपीएलमध्ये आज झालेल्या लढतीत
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 6 - लँडल सिमॉन्स आणि कायरन पोलार्डच्या तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने आयपीएलमध्ये आज झालेल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 146 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने आज मिळवलेला विजय आयपीएलमध्ये धावांच्या अंतराने मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला आहे या विजयासह मुंबईने नऊ विजय आणि 18 गुणांसह आयपीएल-10 च्या गुणतालिकेती अव्वलस्थान कायम राखले.
गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीने दोनशेहून अधिक धावांच्या आव्हानाचा लिलया पाठलाग केला होता. त्यामुळे आजही त्यांच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा होती. पण मुंबईने विजयासाठी दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची फलंदाजी सुरुवातीपासूनच कोलमडली. मलिंंगा, करण शर्मा आणि हरभजनच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीच्या एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. अखेर 14व्या षटकात त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 66 धावांत गारद झाला. मुंबईकडून कर्ण शर्मा आणि हरभजन सिंगने प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर मलिंगाला दोन बळी मिळाले. दिल्लीकडून सर्वाधिक 21 धावा करुण नायरने काढल्या.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या दिल्लीला आज पोलार्ड आणि सिमॉन्स वादळाने चांगलंच झोडून काढलं. मुंबई इंडियन्सने तुफान फलंदाजी करत दिल्लीसमोर बलाढ्या 212 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासून फटकेबाजी करायला सुरुवात केली. सिमॉन्सने आणि पार्थिवने संघाला योग्य सुरुवात मिळवून दिली. मात्र पार्थिव आणि रोहित शर्मा मोठी खेळी करु शकले नाही. पार्थिवने 25 तर रोहित शर्माने 10 धावा केल्या. आधी रोहीत सिमॉन्स आणि नंतर पोलार्डने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे दिल्लीची चांगलीच दाणादाण उडाली.
सिमॉन्सने 43 चेंडूत 66 धावा केल्या, तर पोलार्डने 35 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. हार्दिक पांड्याही जबरदस्त फॉर्ममध्ये असून शेवटच्या ओव्हर्समध्ये त्यानेही चांगलेच फटके लगावले. हार्दिकने 14 चेंडूत 29 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये एकूण 23 धावा फटकावल्या गेल्या.