IPL 10 - निराश ए. बी. डिव्हिलियर्स मायदेशी रवाना

By admin | Published: May 9, 2017 01:56 PM2017-05-09T13:56:11+5:302017-05-09T13:56:11+5:30

आयपीएलचे दहावे पर्व आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. स्पर्धेतील प्लेऑफचे संघ कोणते असतील, हे जवळ-जवळ निश्चित झाले आहे

IPL 10 - disappointed A. B Deviers leave home | IPL 10 - निराश ए. बी. डिव्हिलियर्स मायदेशी रवाना

IPL 10 - निराश ए. बी. डिव्हिलियर्स मायदेशी रवाना

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - आयपीएलचे दहावे पर्व आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. स्पर्धेतील प्लेऑफचे संघ कोणते असतील, हे जवळ-जवळ निश्चित झाले आहे. खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे दहाव्या स्तत्रातून आरसीबीला प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे. आरसीबीला13 सामन्यात 10 पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. संघाच्या या निराशजनक कामगिरीनंतर ए. बी. डिव्हिलियर्स मायदेशी रवाना झाला आहे. ट्विटरवरुन त्याने ही माहिती दिली.
आपल्या ट्विटमध्ये आरसीबीच्या दहाव्या सत्रातील कामगिरीवर निराश असल्याचे त्याने सांगितले. या सत्रात आम्हाला कठीण गेलं असले तर याधून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. याचा फायदा पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत होईल अशी आशा आहे. मी आनंदी आहे जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी कुटुंबा समवेत आहे.

 

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल मोसमातील निराशाजनक कामगिरीबद्दल बंगळुरुवासियांची आणि संघाच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. विराट कोहलीने संघाच्या सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात पराभव पत्करावा लागल्यानंतर कोहलीने ट्विटरवरुन संघाच्या चाहत्यांची आणि समर्थकांची माफी मागितली. संघ पराभूत होत असतानाही संघाला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे विराट कोहलीने आभार मानले.
आरसीबीमध्ये महान खेळाडूंची नावे आहेत, विराट कोहली, ख्रिस गेल, ए. बी. डिव्हीलियर्स, शेन वॅटसन या दिग्गज खेळाडूंपैकी एक जणही चालू शकला नाही. गोलंदाजीतही निराशाच झाली. आरसीबीने ज्याप्रमाणे एकापाठोपाठ एक सामने हरले ते पाहता, केवळ स्टार खेळाडू संघात असले तर ते सामने जिंकून देतील, याची खात्री देता येत नाही. गेल्यावर्षीचा उपविजेता असलेला आरसीबी संघ यंदा तळाच्या स्थानावर आहे. 

 Thanks to the @RCBTweets fans for all the unconditional love and support this season as well. Sorry we couldn"t play up to our standards.

— Virat Kohli (@imVkohli) May 7, 2017

 

Web Title: IPL 10 - disappointed A. B Deviers leave home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.