IPL 10 - या पाच भारतीय खेळाडूंना लागली लॉटरी

By admin | Published: February 20, 2017 07:14 PM2017-02-20T19:14:09+5:302017-02-20T20:21:58+5:30

स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळण्यासाठी आयपीएलची सुरवात झाली होती. या लिलावात पाच स्थानिक खेळाडूंना मूळ किमतीच्या 200 ते 300 पट अधिक रक्कम देऊन खरेदी करण्यात आले आहे

IPL 10 - The five Indian players took the lottery | IPL 10 - या पाच भारतीय खेळाडूंना लागली लॉटरी

IPL 10 - या पाच भारतीय खेळाडूंना लागली लॉटरी

Next

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 20 - दहाव्या पर्वासाठी बंगळुरुत झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये भारतीय युवा खेळाडूंना लॉटरी लागली आहे. या लिलावामध्ये 350 पेक्षा अधिक खेळाडूंचा समावेश होता यामधून 76 खेळाडूंना 8 संघांनी करारबद्ध केले आहे. सर्वाधिक भाव मिळालेल्या पहिल्या पाच खेळाडूमध्ये एकही भारतीय नाही हे विशेष. भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक बोली कर्ण शर्मावर लागली आहे. मुंबई संघाने कर्ण शर्माला 3.2 कोटी रुपयात करारबद्ध केले.

स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळण्यासाठी आयपीएलची सुरवात झाली होती. या लिलावात पाच स्थानिक खेळाडूंना मूळ किमतीच्या 200 ते 300 पट अधिक रक्कम देऊन खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये टी नजराजन या वेगवान गोलंदाजाला त्याच्या पायाभूत किंमतीच्या 300 टक्के जास्त पैसे मोजून किंग्ज इलेव्हन पंजाबने घेतले आहे. नटराजनला किंग्ज इलेव्हनने ३ कोटी रुपयांमध्ये घेतले आहे. 10 लाख मूळ किंमत असलेल्या अनिकेत चौधरीला आरसीबीने २ कोटींमध्ये घेतले तर के. गौतमला मुंबईने 2 कोटीमध्ये खरेदी केले. तर 10 लाख बोली असलेल्या एम. अश्विनला दिल्ली संघाने कोटींचा करार करत आपल्या तंबूत दाखल केले. 20 लाख रुपये मूळ किंमत असलेल्या मोहम्मद शिराजला सनरायझर्स हैदराबाद संघाने 2.06 कोटी रुपयांमध्ये आपल्या चमूत दाखल केले.

Web Title: IPL 10 - The five Indian players took the lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.