IPL - 10 : अनुभवहीन दिल्लीसमोर गुजरातचे आव्हान
By admin | Published: May 4, 2017 07:12 PM2017-05-04T19:12:19+5:302017-05-04T19:12:19+5:30
युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली संघासमोर रैनाच्या गुजरात लायन्सचे आव्हान आहे. दिल्ली संघाने गेल्या सामन्यात नवख्या कर्णधाराच्या नेतृत्वात मजबूत सनरायजर्सवर
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.04 - युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली संघासमोर रैनाच्या गुजरात लायन्सचे आव्हान आहे. दिल्ली संघाने गेल्या सामन्यात नवख्या कर्णधाराच्या नेतृत्वात मजबूत सनरायजर्सवर विजय मिळवला असला, तरी कमी अनुभव हीच दिल्लीची कमकुवत बाजू आहे. दोन्ही संघ गुणतक्त्यात तळाच्या स्थानावर आहे.
त्यामुळे आयपीएलच्या दहाव्या पर्वात आरसीबीनंतर बाहेर पडणारा संघ कोणता, हे ठरेल. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर थोड्याच वेळात गुजरात लायन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स हा सामना सुरू होत आहे. संजू सॅमसन, करुण नायर, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, जयंत यादव, शाहबाज नदीम हे युवा खेळाडू दिल्ली संघाचे आधारस्तंभ आहेत. मागच्या सामन्यात या खेळाडूंनी आपल्या खेळाचा दम हैदराबादला दाखवला होता. मात्र अनुभवी खेळाडू म्हणून कोरी अँडरसन, ख्रिस मॉरीस आणि अमित मिश्रा हे संघाचे सर्वात अनुभवी खेळाडू आहे. कर्णधार म्हणून नायरचा तिसराच सामना आहे. कसोटीतील त्रिशतकी खेळीनंतर सनरायजर्स विरोधात त्याची बॅट तळपली. रिषभ पंत, श्रेयस अय्यर हे सातत्याने धावा काढतात. मात्र मोठी खेळी करण्यात दोन्ही फलंदाजांना अपयश आले आहे.
जहीरच्या अनुपस्थितीत संघात पुनरागमन केलेल्या मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवून दिली. त्याने दोन महत्त्वपूर्ण बळी घेतले. अँजेलो मॅथ्युज् आणि कासिगो रबाडा यांनाही या सामन्यात विजयासाठी आपल्या अनुभवाचा फायदा संघाला करून द्यावा लागेल. गुजरातचा संघ गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे. तर दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघाचे आठ गुण असले. तरी गुजरातचे साखळी स्पर्धेत १० सामने तर दिल्लीचे ९ सामने झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांना गुणतक्त्यात चौथ्यास्थानावर पोहचण्यासाठी पुढचे सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे आरसीबीपाठोपाठ स्पर्धेबाहेर पडणारा दुसरा संघ कोणता हे ठरेल.