IPL 10 : हार्दिक आणि कृणाल पांड्या भिडले, सेहवागची मध्यस्थी

By admin | Published: May 15, 2017 04:28 PM2017-05-15T16:28:37+5:302017-05-15T16:59:56+5:30

मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारे पांड्या भावंडं ट्विटरवर एकमेकांना भिडले आहेत. मात्र, दोघांमध्ये वादाचं नेमकं कारण काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही

IPL 10: Hardik and Krishanal Pandya face, Sehwag intervened | IPL 10 : हार्दिक आणि कृणाल पांड्या भिडले, सेहवागची मध्यस्थी

IPL 10 : हार्दिक आणि कृणाल पांड्या भिडले, सेहवागची मध्यस्थी

Next
ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 15 - मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारे पांड्या भावंडं ट्विटरवर एकमेकांना भिडले आहेत. मात्र, दोघांमध्ये वादाचं नेमकं कारण काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान दोघांचं भांडण सोडवण्यासाठी भारताचा माजी धडाकेबाज खेळाडू विरेंद्र सेहवागने पुढाकार घेतला आणि या जोडीला भांडण न करण्याचा सल्ला दिला आहे. 
 
हार्दिक पांड्याच्या एका ट्विटनंतर दोघा भावंडांमध्ये कोणत्यातरी कारणावरून खटके उडाल्याचं सर्वश्रूत झालं. ""जे लोक तुमच्या अगदी जवळचे असतात तेच लोकं जीवनात तुम्हाला सर्वाधिक निराश करतात, हे योग्य नाही भावा"" असं ट्विट हार्दिकने केलं होतं.  
या ट्विटला कृणाल पांड्यानेही उत्तर दिलं. ""हे पहिल्यापासूनच व्हायला नको होतं... अखेर काही कारणामुळे मी तुझा मोठा भाऊ आहे...चल आता हा वाद आणखी वाढवू नकोस"". असं ट्विट त्याने केलं.
 
दरम्यान, दोन भावंडांमधील वाद सोडवण्यासाठी सेहवागने पुढाकार घेतला. त्याने आपल्या खास अंदाजात  ""बाप बड़ा न भैया सबसे बड़ा रुपैया। लगता है इस गाने को तुम दोनों ने कुछ ज्यादा ही गंभीरता से ले लिया है। लड़ो मत यार!"" असं ट्विट करून भांडण न करण्याचा सल्ला दिला. 
 
 
दुसरीकडे दोघांमधील या भांडणाची ट्विटराइट्सकडून खिल्ली उडवली जात आहे. तर काही जणांनी भांडणं घरी बसून सोडवावीत असा सल्ला दिला आहे.  
काही दिवसांपूर्वीच दोघा भावांनी मुंबईत घर खरेदी केलं आहे. गुजरातच्या बडोदाचे रहिवासी हे दोघं भावंडं आयपीएल 10 मध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करत असून दमदार खेळ करून दोघांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.   
 

Web Title: IPL 10: Hardik and Krishanal Pandya face, Sehwag intervened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.