आयपीएल-१० : थरार ५ एप्रिलपासून

By admin | Published: November 9, 2016 02:08 AM2016-11-09T02:08:30+5:302016-11-09T02:08:30+5:30

इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव पुढील महिन्यात बंगळुरूमध्ये होणार असून, स्पर्धेचा थरार २९ मार्चला समाप्त होणाऱ्या आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर ५ एप्रिलपासून सुरू होणार

IPL-10: Tharar from April 5 | आयपीएल-१० : थरार ५ एप्रिलपासून

आयपीएल-१० : थरार ५ एप्रिलपासून

Next

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव पुढील महिन्यात बंगळुरूमध्ये होणार असून, स्पर्धेचा थरार २९ मार्चला समाप्त होणाऱ्या आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर ५ एप्रिलपासून सुरू होणार
आहे. दहा वर्षांतील ही अखेरची स्पर्धा आहे. आयपीएल संचालन परिषदेने आयपीएल फ्रॅन्चायझी कार्यशाळेचे आयोजन दुबईमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, २००८ पासून प्रारंभ झालेल्या या स्पर्धेच्या दहाव्या पर्वात महाराष्ट्रातील केंद्र मुंबई, पुणे आणि नागपूर येथे सामन्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
गेल्यावर्षी महाराष्ट्रातील दुष्काळ, पाण्याचे संकट यामुळे स्टेडियमची जोपासना करण्यासाठी पाण्याच्या उपयोगामुळे प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे राज्यात आयोजित सामने अन्य स्थळी स्थानांतरित करण्यात आले. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर, सचिव अजय शिर्के, संचालन परिषदेचे अध्यक्ष राजीव शुक्ला, माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली, झारखंड क्रिकेट संघटनेचे प्रमुख अमिताभ चौधरी आणि पंजाब क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष एम. पी. पांडव बैठकीला उपस्थित होते.

Web Title: IPL-10: Tharar from April 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.