IPL 10 - VIDEO : लीन बाद झाल्यानंतर प्रिती झिंटाचा झिंगाट डान्स

By admin | Published: May 10, 2017 01:53 PM2017-05-10T13:53:46+5:302017-05-10T14:35:12+5:30

आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने कोलकाता नाइट रायडर्सचा 14 धावांनी पराभव केला.

IPL 10 - VIDEO: Preity Zinta's Zangat Dance after Lean is gone | IPL 10 - VIDEO : लीन बाद झाल्यानंतर प्रिती झिंटाचा झिंगाट डान्स

IPL 10 - VIDEO : लीन बाद झाल्यानंतर प्रिती झिंटाचा झिंगाट डान्स

Next

ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. 10 - आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने कोलकाता नाइट रायडर्सचा 14 धावांनी पराभव केला. फलंदाजांच्या समाधानकारक कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर पंजाबने प्ले ऑफ गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या आहे. श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात मोक्याच्या वेळी अक्षर पटेलने केलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर पंजाब विजयी झाले. त्यामुळे संघाची सहमालक प्रिती झिंटा खुशीत आहे.
प्रितीचा उत्साह तिच्या कालच्या सामन्यात दिसून येत होता. संघातील खेळाडूंना ती प्रचंड टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होती. तसेच सामन्याच्या दरम्यान अक्षर पटेलने क्रिस लीनला धावबाद केले, त्यानंतर तिचे हावभाव पाहाण्यासारखे होते. तिसऱ्या पंचांकडे इशारा केल्यानंतर तिला थोडावेळ दडपण आले होते. मात्र स्क्रीनवरच्या रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, क्रिस लीन बाद आहे. त्यानंतर तिने उड्या मारल्या आणि अगदी बॉलिवूड स्टाईलने आपला आनंद व्यक्त केला.

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 167 धावा उभारल्यानंतर कोलकाताला 20 षटकांत 6 बाद 153 धावांचीच मजल मारता आली. लीनने शानदार 52 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह 84 धावांची खेळी करून कोलकाताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. परंतु, 18 व्या षटकात तो धावबाद झाला आणि सामना पंजाबच्या बाजूने झुकला. येथून पंजाबने मजबूत पकड मिळवताना सामना आपल्या नावे केला. मोहित शर्मा व युवा फिरकीपटू राहुल तेवटिया यांनी अचूक मारा करताना कोलकाताला फटकेबाजीपासून दूर ठेवले.

Web Title: IPL 10 - VIDEO: Preity Zinta's Zangat Dance after Lean is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.