IPL -10 : वाह..! सचिन, बिग बीकडून ऋषभ पंतचे कौतुक
By admin | Published: May 5, 2017 12:44 PM2017-05-05T12:44:45+5:302017-05-05T12:53:59+5:30
ऋषभ पंतने केलेली तुफान फलंदाजी पाहून खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सुद्धा त्याचे कौतुक करत आयपीएलच्या सर्व दहा पर्वातील फलंदाजाच्या खेळी पाहिल्या
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 05 - आयपीएलच्या दहाव्या पर्वात दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गुजरात लायन्स यांच्यातील काल झालेल्या लढतील दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ऋषभ पंत याने झुंझार खेळी केली. त्याने केलेली खेळी पाहून क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुद्धा भारावून केला.
गुजरात लायन्स विरुद्धच्या या सामन्यात ऋषभ पंतने अवघ्या 43 चेंडूत 97 धावांची दमदार खेळी करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच, ऋषभ पंतने केलेली तुफान फलंदाजी पाहून खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सुद्धा त्याचे कौतुक करत आयपीएलच्या सर्व दहा पर्वातील फलंदाजाच्या खेळी पाहिल्या, तरी ही यामधील सर्वोत्तम खेळी असल्याचे सांगितले. याचबरोबर, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सुद्धा ऋषभ पंतचे ट्विट करुन कौतुक केले आहे. ते म्हणाले, भन्नाट खेळी. 100 धावा न केल्याचं दु:ख नाही. आमच्यासाठी हे शतकापेक्षा जास्त आहे.
One of the best Innings I have seen in the IPL & that includes all 10 seasons. @RishabPant777pic.twitter.com/SGv3YuXwJ5
— sachin tendulkar (@sachin_rt) May 4, 2017
T 2414 - UFFFFFFF !! what an innings played by #Rishabhpant .. never mind the 100 .. for us it was more than that !! pic.twitter.com/PlopB3PEcr
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 4, 2017
दरम्यान, फिरोझशाह कोटला स्टेडियवर काल झालेल्या या सामन्यात दिल्लीकरांनी चांगली सुरुवात करताना गुजरातला झटपट दोन धक्के दिले. मात्र, नंतर गुजरातचा कर्णधार सुरेश रैना व दिनेश कार्तिक यांनी गुजरातला 20 षटकांत 7 बाद 208 धावांची मजबूत मजल मारून दिली. या वेळी, दिल्लीच्या हातून हा सामना निघून गेल्याचेच चित्र दिसत होते. परंतु, सॅमसन - पंत यांंच्या जोरावर दिल्लीने 17.3 षटकांतच बाजी मारताना 3 बाद 214 धावा केल्या.
कर्णधार करुण नायर (12) अपयशी ठरल्यानंतर सॅमसन - पंत यांनी 143 धावांची तुफानी भागीदारी करून दिल्लीला विजयी मार्गावर आणले. सॅमसनने 31 चेंडंूत 7 षटकारांचा नजराणा पेश करून 61धावा कुटल्या. दुसरीकडे, पंतने 43 चेंडूंत 97 धावांची वादळी खेळी केली. विशेष म्हणजे अनुभवी रवींद्र जडेजावर हल्ला चढवताना या दोघांनी त्याला 2 षटकांत 28 धावांचा चोप दिला. हे दोघे बाद झाल्यनंतर श्रेयस अय्यर व कोरी अँडरसन यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंत शतकापासून केवळ 3 धावा दूर असताना बाद झाला. तत्पूर्वी, द्वेन स्मिथ - ब्रेंडन मॅक्युलम ही आक्रमक सलामी जोडी स्वस्तात परतल्यानंतर रैनाने केलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने धावांचा डोंगर रचला.
स्मिथ (9) आणि मॅक्युलम (1) स्वस्तात परतल्याने गुजरातची दुसऱ्याच षटकात 2 बाद 10 धावा अशी अवस्था झाली होती. मात्र, रैनाने सगळी सूत्रे आपल्याकडे घेत चौफेर फटकेबाजी करत 43 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारांसह 77 धावांची खेळी केली. रैनानंतर कार्तिकने आक्रमक पवित्रा घेत 34 चेंडूंत 5 चौकार व 5 षटकारांसह 65 धावा काढल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये रवींद्र जडेजाने (7 चेंडूंत 18*) केलेल्या फटकेबाजीमुळे गुजरातने दोनशेचा पल्ला पार केला.