IPL 2017 लिलावाला सुरुवात, बेन स्टोक्स पुण्याच्या ताफ्यात
By admin | Published: February 20, 2017 10:38 AM2017-02-20T10:38:15+5:302017-02-20T12:26:56+5:30
इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वासाठी खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 20 - इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वासाठी खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. यावेळी भारतीय युवा खेळाडू व अफगाणच्या खेळाडूंवर सर्वांची नजर आहे. लिलावामध्ये ३५० पेक्षा अधिक खेळाडूंचा समावेश असून, जास्तीत जास्त ७६ खेळाडूंना करारबद्ध करता येणार आहे. खेळाडूंची बोली लावण्यास सुरुवात झाली असून अनेक मोठ्या खेळाडूंना घेण्यात फ्रँचायझींनी अनुकूलता दाखवलेली नाही. युवा खेळाडू सौरव तिवारी आणि इरफान पठाणला कोणत्याही संघाने घेतलेलं नाही.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सर्वांची पसंती मिळाली असून 14.50 कोटींची बोली लागली. 2 कोटी बेस प्राईस असलेल्या स्टोक्ससाठी मुंबई इंडियन्सने बोली लावली, पण अखेर पुणे सुपरजायंट्सला स्टोक्सची खरेदी करण्यात यश मिळालं.
कोणत्या खेळाडूवर कितीची बोली -
- इंग्लंडचा कप्तान इयॉन मॉर्गनला किंग्ज इलेव्हन पंजाबने 2 कोटींमध्ये खरेदी केले.
- इंग्लंडच्या बेन स्टोक्सला 14.50 कोटींची बोली, स्टोक्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स ताफ्यात.
- इरफान पठाणला कोणीही खरेदी केलं नाही.
- निकोलस पुरनची मुंबई इंडियन्सकडून 30 लाख रुपयांत खरेदी
- इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला खरेदीदार मिळाला नाही
- श्रीलंकेचा अॅजलो मॅथ्यूज आणि न्यूझीलंडचा कोरी अॅडरसन दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या ताफ्यात
- कोरी अँडरसनला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1 कोटीत खरेदी केलं.
- अँजेलो मॅथ्यूजला दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 2 कोटीत खरेदीची
- कॅगिसो रबाडाची दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 5 कोटींमध्ये खरेदी
- टी. मिल्ससाठी विक्रमी बोली, 12 कोटींमध्ये आरसीबीकडून खरेदी
- मिचेल जॉन्सन मुंबई इंडियन्सकडून खेळणार, 2 कोटींमध्ये खरेदी
- प्रज्ञान ओझासाठी एकाही संघाने बोली लावली नाही
- इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून 12 कोटी रुपयांचा भाव
- न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टची कोलकाता नाईट रायडर्सकडून 5 कोटी रुपयांत खरेदी.
- ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून साडे चार कोटींची बोली
- ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनची मुंबई इंडियन्सकडून दोन कोटीत खरेदी
- वेस्ट इंडियन यष्टिरक्षक निकोलस पूरनची मुंबई इंडियन्सकडून फक्त 30 लाखात खरेदी
- तन्मय अगरवालला 10 लाखांच्या मूळ किमतीतच सनरायझर्स हैदराबादने केलं खरेदी
- राजस्थानचा डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून 2 कोटींची बोली.
- कर्नाटकचा अष्टपैलू कृष्णाप्पा गौतमसाठी मुंबई इंडियन्सची दोन कोटींची बोली.
- मोहम्मद नबी ठरणार आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अफगाणी. सनरायझर्स हैदराबादकडून 30 लाखांत खरेदी.
- अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशिद खान अहमदला सनरायझर्स हैदराबादकडूकडून 50 लाखांवरून 4 कोटींची बोली.