आयपीएल ९ : आंद्रे रसेल दिल्लीला नडला

By admin | Published: April 10, 2016 08:54 PM2016-04-10T20:54:57+5:302016-04-10T23:04:00+5:30

आंद्रे रसेलने दिल्ली डेयरडेविल्सची आघाडीची फळी उध्वस्त करत दिल्लीला धावांचा डोंगर उभा करण्यापासून रोखले. त्याने आघाडीच्या ३ फलंदाजांना बाद करत कंबरडेच मोडले.

IPL 9: Andre Russell picks up Delhi | आयपीएल ९ : आंद्रे रसेल दिल्लीला नडला

आयपीएल ९ : आंद्रे रसेल दिल्लीला नडला

Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १० - आंद्रे रसेलने दिल्ली डेयरडेविल्सची आघाडीची फळी उध्वस्त करत दिल्लीला धावांचा डोंगर उभा करण्यापासून रोखले. त्याने आघाडीच्या ३ फलंदाजांना बाद करत कंबरडेच मोडले. दिल्लीने आक्रमक सुरवात केली होती. डि कॉक आणि आग्रवाल यांनी पहिल्या २ षटकात २४ धावा वसूल केल्या होत्या. कोलकातासाठी रसेल तिसरे षटक घेऊन आला डेयरडेविल्स ढेपाळले. रसेलने डि कॉक (१७), आग्रवाल(९) आणि श्रेअस अयरला(०) बाद केले. तर जॉन हेस्टिंग्स, ब्रॉड हॉग आणि चावलानी नायर(३), नेगी(११), आणि धोकादायक कार्लोस ब्रेथवेट(६) बाद करत अर्धा संघ तंबूत झाडला. ११ षटकानंतर दिल्ली डेयरडेविल्सने ६ गड्याच्या मोबदल्यात ६८ केल्या आहेत
आयपीएलच्या ९व्या सत्राची काल मुंबई आणि पुण्याच्या सामन्याने सुरवात झाली, आज ९ व्या सत्रातील दुसरा सामना कोलकाताच्या इडण गार्डण मैदानावर खेलवला जात आहे. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकूण प्रथ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दिल्ली डेयरडेविल्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात येईल. यावर्षी दिल्ली डेयरडेविल्सने कर्णधारपदाची धुरा अनुभवी जलदगती गोंलदाज झहीर खान कडे सापवली आहे. 
टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चार षट्कार ठोकून ‘किंग’ बनलेला वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रेथवेट याच्या कामगिरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढतीदरम्यान विशेष लक्ष राहील.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरचा घरच्या मैदानावरील रेकॉर्ड उत्तमच आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अपेक्षानुरुप कामगिरी न करू शकलेल्या या संघाला संयोजन सुधारावे लागेल. केकेआरला पाच वर्षांत तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी पहिल्या सामन्यापासून विजयी लय कायम राखायची आहे.
दिल्लीने यंदा संघात आमूलाग्र बदल केले. युवा खेळाडूंवर यंदा अधिक विश्वास दाखविण्यात येत आहे. ब्रेथवेटवर या संघाने चार कोटी २० लाख खर्च केले तेव्हा फारसे कुणी ओळखत नसावेत पण टी-२० विश्वचषकाने त्याला स्टार बनविले. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखालील दिल्ली संघात रिषभ पंत, महिपाल लोमरोर, खलिद अहमद हे १९ वर्षे गटातील खेळाडू आहेत. संजू सॅमसन, करुण नायर, पवन नेगी, श्रेयस अय्यर हे त्यांना मार्गदर्शन करतील.
प्रतिस्पर्धी संघ - 
दिल्ली डेयरडेविल्स : झहीर खान (कर्णधार), क्वींटन डिकॉक, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, करुण नायर, संजू सॅमसन, पवन नेगी, कार्लोस ब्रेथवेट,ख्रिस मॉरिस, अमित मिश्रा, नाथन कोल्टर नाइल
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, कोलिन मुन्रो, आंद्रे रसेल, युसूफ पठाण, पीयूष चावला, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जॉन हेस्टिंग्स, ब्रॉड हॉग

Web Title: IPL 9: Andre Russell picks up Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.