आयपीएल ९ : दिल्लीची फलंदाजी ढेपाळली, केकआरसमोर ९९ धावांचे आव्हान
By Admin | Published: April 10, 2016 09:25 PM2016-04-10T21:25:24+5:302016-04-10T21:25:24+5:30
केकेआरच्या धारधार गोंलदाजी समोर दिल्ली डेयरडेविल्सला संपुर्ण २० षटकेही फलंदाजी करता आली नाही. दिल्ली डेयरडेविल्सने निर्धारित १७.४ षटकात सर्वबाद ९८ धावापर्यंत मजल मारता आली
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १० - कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करताना आंद्रे रसेल, ब्रॉड हॉग, जॉन हेस्टिंग्सने आणि पीयूष चावलाच्या शिस्तबध्द गोलंदाजी समोर दिल्ली डेयरडेविल्सची तगडी फलंदाजी ढासळली, रसेलने आघाडीच्या ३ फलंदाजांना बाद केले तर ब्रॉड हॉग, आणि पीयूष चावलाने शेपूट गुंडाळले. केकेआरच्या धारधार गोंलदाजी समोर दिल्ली डेयरडेविल्सला संपुर्ण २० षटकेही फलंदाजी करता आली नाही. दिल्ली डेयरडेविल्सने निर्धारित १७.४ षटकात सर्वबाद ९८ धावापर्यंत मजल मारता आली. त्यामुळे विजयासाठी केकेआरसमोर ९९ धावांचे सोपे आव्हान आहे.
आंद्रे रसेलने दिल्ली डेयरडेविल्सची आघाडीची फळी उध्वस्त करत दिल्लीला धावांचा डोंगर उभा करण्यापासून रोखले. त्याने आघाडीच्या ३ फलंदाजांना बाद करत कंबरडेच मोडले. दिल्लीने आक्रमक सुरवात केली होती. डि कॉक आणि आग्रवाल यांनी पहिल्या २ षटकात २४ धावा वसूल केल्या होत्या. कोलकातासाठी रसेल तिसरे षटक घेऊन आला डेयरडेविल्स ढेपाळले. रसेलने डि कॉक (१७), आग्रवाल(९) आणि श्रेअस अयरला(०) बाद केले. तर जॉन हेस्टिंग्सने नायर(३) आणि नाथन कोल्टर नाइलला(७) बाद केले. ब्रॉड हॉगने आपल्या ४ षटकात १९ धावा देत, मिश्रा(३), संजू सॅमसन(१५) आणि पवन नेगीला (११)बाद केले. चावलाने आपल्या लेगस्पिन गोलंदाजीने ख्रिस मॉरिस(११), धोकादायक कार्लोस ब्रेथवेट(६) यांना बाद केले.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरचा घरच्या मैदानावरील रेकॉर्ड उत्तमच आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अपेक्षानुरुप कामगिरी न करू शकलेल्या या संघाला संयोजन सुधारावे लागेल. केकेआरला पाच वर्षांत तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी पहिल्या सामन्यापासून विजयी लय कायम राखायची आहे.
दिल्लीने यंदा संघात आमूलाग्र बदल केले. युवा खेळाडूंवर यंदा अधिक विश्वास दाखविण्यात येत आहे. ब्रेथवेटवर या संघाने चार कोटी २० लाख खर्च केले तेव्हा फारसे कुणी ओळखत नसावेत पण टी-२० विश्वचषकाने त्याला स्टार बनविले. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखालील दिल्ली संघात रिषभ पंत, महिपाल लोमरोर, खलिद अहमद हे १९ वर्षे गटातील खेळाडू आहेत. संजू सॅमसन, करुण नायर, पवन नेगी, श्रेयस अय्यर हे त्यांना मार्गदर्शन करतील.
प्रतिस्पर्धी संघ -
दिल्ली डेयरडेविल्स : झहीर खान (कर्णधार), क्वींटन डिकॉक, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, करुण नायर, संजू सॅमसन, पवन नेगी, कार्लोस ब्रेथवेट,ख्रिस मॉरिस, अमित मिश्रा, नाथन कोल्टर नाइल
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, कोलिन मुन्रो, आंद्रे रसेल, युसूफ पठाण, पीयूष चावला, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जॉन हेस्टिंग्स, ब्रॉड हॉग