IPL 9 - नेगीची १ धाव १५ लाखात तर इंशातची एक विकेट सव्वा कोटी रुपयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2016 01:19 PM2016-05-29T13:19:32+5:302016-05-29T13:19:32+5:30
पवन नेगीच्या प्रत्येक धावेमागे दिल्लीने १५ लाख रुपये मोजले आहेत. तर इंशात शर्माने IPL 9 मध्ये फक्त ३ विकेट घेतल्या आहेत. त्याची प्रत्येक विकेट १.२५ कोटी रुपयात पडली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ : प्रेरणादायी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज रविवारी आयपीएल-९ च्या विजेत्यांचा फैसला होणार आहे. बेंगळुरू तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला, हे विशेष. उभय संघांची नजर पहिल्या आयपीएल जेतेपदावर असेल. मात्र, आयपीएल-९ मध्ये बाद फेरीला सुरुवात होताच खेळाडू आणि संघांच्या कामगिरीचे मोजमाप सुरू झाले आहे. नेहमीप्रमाणे या वेळीसुद्धा अनेक विक्रम घडले. कोहलीने रेकॉर्डब्रेक फलंदाजी केली, तर यजुवेंद्र चहलसारखे युवा खेळाडू आयपीएलमध्ये चमकले.
धोनीसारखे दिग्गजांनी निराशाजनक प्रदर्शन करून स्पर्धेबाहेर झाले. सर्वाधिक चर्चा तर कोहलीची झाली. त्याने चार शतके ठोकली. टी-२० च्या इतिहासात प्रथमच एका वर्षात एखाद्याने इतकी शतके ठोकली. स्पर्धेच्या आधी बोली प्रक्रियेतला सर्वाधिक महगडा पवन नेगी मैदानावरही महागडा ठरला. महागड्या नेगीला खरेदी करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला स्पर्धेच्या मध्येच काही सामन्यांत बाहेर बसवले. पवन नेगीला ८.५ कोटी रुपयात दिल्ली संघाने खरेदी केले होते. तर नवख्या पुणे संघाने इंशात शर्माला ३.८ कोटी रुपयात खरेदी केले होते. पवन नेगीच्या प्रत्येक धावेमागे दिल्लीने १५ लाख रुपये मोजले आहेत. तर इंशात शर्माने IPL 9 मध्ये फक्त ३ विकेट घेतल्या आहेत. त्याची प्रत्येक विकेट १.२५ कोटी रुपयात पडली आहे.
कर्णधार एम.एस धोनी स्पर्धेच्या सुरवातीला फ्लॉप ठरला पण स्पर्धेच्या अंतीम टप्यात त्याने सन्माजनक कामगीरी केली. इरफान पठाण - १.५ कोटी - गोलंदाजीत त्याने एकही विकेट घेतली नाही तर फलंदाजीतही तो अपयशी ठरला, त्याची १ धाव १.५० कोटी रुपयात पडली.
एरॉन फिंचला गुजरातने १ कोटी रुपयात खरेदी केली होती त्याने स्पर्धेत सन्मानजन कामगीरी करत पैसा वसूल फलंदाजी केली. युवी यजुवेंद्र चहल याने देखील चमकदार कामगीरी केली. १० सामन्यात त्याने १९ वळी मिसवले आहेत.
दुखापतीमुळे बाहेर असणाऱ्या मिशेल जॉनस्नला पंजाबने ६.५ कोटी मध्ये खरेदी केले त्याने ३ सामन्यात फक्त २ बळी मिळवले. विंडीजला विजेतेपद मिळवून देण्यात म्हत्वाचा वाटा मिळवणाऱ्या ब्रेथवेटला दिल्लीने ४.५ कोटीमध्ये खरेदी केले खरे पण ८ सामन्यात ८३ धावा आणि ७ बळी अशीच कामगीरी केली.
कोहली, रैना, स्मिथ, म्यॅक्युलम,वॅटसन,एबी, झहीर, रोहीत आणिकृणाल पांड्या यांनी आयपीएल ९ मध्ये चमकदार कामगीरी करत संघाच्या विजयात महत्वपुर्ण वाटा उचलला.