IPL लिलाव : वॉटसन, नेगी व युवराज सर्वात महाग खेळाडू

By admin | Published: February 6, 2016 10:04 AM2016-02-06T10:04:38+5:302016-02-06T17:57:30+5:30

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या नवव्या सत्राच्या लिलावात शेन वॉटसन आणि अष्टपैलू युवराज सिंग सर्वात महाग खेळाडू ठरले.

IPL auction: Watson, Negi and Yuvraj are the most expensive players | IPL लिलाव : वॉटसन, नेगी व युवराज सर्वात महाग खेळाडू

IPL लिलाव : वॉटसन, नेगी व युवराज सर्वात महाग खेळाडू

Next
>
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ६ - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या नवव्या सत्राच्या लिलावात शेन वॉटसन, पवन नेगी आणि अष्टपैलू युवराज सिंग सर्वात महाग खेळाडू ठरले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने तब्बल ९.५ कोटी रुपये देऊन शेन वॉटसनला, दिल्ली डेअरडेव्हिल्सने ८.५ कोटी रुपये देत नेगीला तर सनरायजर्स हैदराबादने ७ कोटींची बोली लावून युवराजला खरेदी केले. शनिवारी सकाळी ३५१ क्रिकेटपटूंच्या लिलावास सुरूवात झाली
दरम्यान ‘रायझिंग पुणे’ संघाने इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसनला साडेतीन कोटी रुपयांत तर इशांतसाठी ३ कोटी ८० लाख रुपयांची बोली लावत विकत घेतले. तर हैदराबाद संघाने युवराजपाठोपाठ आशिष नेहराला ५.५ कोटी मोजत विकत घेतले. तर वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथ 'दि गुजरात लायन्स' या संघाकडे गेला असून त्याच्यासाठी गुजरातने २ कोटी ३० लाखांची बोली लावली. 
आजच्या लिलावात ३५१ खेळाडूंवर बोली लागली असून त्यात २३० भारतीय, तर १२१ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 
चेतेश्वर पुजारा, हाशिम अमला, न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल, अॅरॉन फिन्च, जॉर्ज बेली, ब्रॅड हॅडीन मनोज तिवारी, उस्मान ख्वाजा यांच्यासाठी कोणीही बोली लावली नाही. 
 
कोणाला मिळाला किती भाव?
 
दिल्ली डेअरडेव्हिल्स
 
संजू सॅमसन - ४.२ कोटी
ख्रिस्तोफर मॉरीस - ७ कोटी
कार्लोस ब्रेथवेट - ४.२ कोटी
करूण नायर - ४ कोटी
ऋषभ पंत - १.९ कोटी
पवन नेगी - ८.५ कोटी
सॅम बिलिंग्ज - ३० लाख
जोएल पॅरीस - ३० लाख
प्रत्युश सिंग - १० लाख
सय्यद अहमद - १० लाख
 
रॉयल चॅलेन्जर्स बँगलोर
 
शेन वॉटसन - ९.५ कोटी
ट्रॅव्हिस हेड - ५० लाख
स्टुअर्ट बिन्नी - २ कोटी
सचिन बेबी - १० लाख
इक्बाल अब्दुल्ला - १० लाख 
अक्षय कर्णेवार - १० लाख
केन रिचर्डसन - २ कोटी
सॅम्युअल बदरी - ५० लाख
 
सनरायझर्स हैदराबाद
 
युवराज सिंग - ७ कोटी
आशिष नेहरा  - ५.५ कोटी
बरिंदर सरन - १.२ कोटी
मुस्तफिझूर रेहमान - १.४ कोटी
अभिमन्यू मिथून - ३० लाख
दीपक हुडा - ४.२ कोटी
आदित्य तरे - १.२ कोटी
टी. सुमन - १० लाख
बेन कटिंग - ५० लाख
विजय शंकर - ३५ लाख
चामा मिलिंद - १० लाख
 
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
 
केविन पीटरसन - ३.५० कोटी
इशांत शर्मा - ३.८० कोटी
इरफान पठाण - १ कोटी 
मिशेल मार्श - ४.८ कोटी 
आर. पी. सिंग - ३० लाख
रजत भाटिया - ६० लाख
अंकित शर्मा - १० लाख
ईश्वर पांडे - २० लाख
मुरुगन अश्विन - ४.५ कोटी
अंकुश बैन्स - १० लाख
पीटर हँड्सकोम्ब - ३० लाख
थिसारा परेरा - १ कोटी
जसकिरण सिंग - १० लाख
अशोक दिंडा - ५० लाख
 
गुजरात लायन्स
 
ड्वेन स्मिथ - २.३० कोटी
डेल स्टेन - २.३ कोटी
धवल कुलकर्णी - २ कोटी
प्रवीण कुमार - ३.५ कोटी
दिनेश कार्तिक - २.३ कोटी
प्रवीण तांबे - २० लाख
पारस डोग्रा - १० लाख
ईशान किशन - ३५ लाख
एकलव्य द्विवेदी - १ कोटी
प्रदीप संगवान - २० लाख
सरबजीत लद्दा - १० लाख
अरॉन फिंच - १ कोटी
उमंग शर्मा - १० लाख
अँड्र्यू टाय - ५० लाख
 
किंग्ज ११ पंजाब
 
मोहित शर्मा - ६.५ कोटी
केल अॅबट - २.१० कोटी
मार्कस स्टॉयनीस - ५५ लाख
के. सी. करिअप्पा - ८० लाख
अरमान जाफर - १० लाख
 
कोलकाता नाईटरायडर्स
 
जयदेव उनाडकट - १.६ कोटी
जॉन हेस्टिंग्ज - १.६ कोटी
कॉलिन मुन्रो - ३० लाख
अंकित राजपूत - १.५ कोटी
जेसन होल्डर - ७० लाख
 
मुंबई इंडियन्स
 
जोस बटलर - ३.८ कोटी
टीम साउदी - २.५ कोटी
नाथू सिंग - ३.२ कोटी
जितेश शर्मा - १० लाख

Web Title: IPL auction: Watson, Negi and Yuvraj are the most expensive players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.