IPL - अखेर ईशांतला मिळाला खरेदीदार, या संघाकडून खेळणार
By admin | Published: April 5, 2017 12:17 PM2017-04-05T12:17:33+5:302017-04-05T12:18:16+5:30
आयपीएल 10 च्या लिलावात ईशांत शर्माला कोणत्याही संघाने खरेदी न केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - आयपीएल 10 च्या लिलावात ईशांत शर्माला कोणत्याही संघाने खरेदी न केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण बॉर्डर-गावस्कर मालिकेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ईशांत शर्माला पंजाब संघाने करारबद्ध केले आहे.
लिलावादरम्यान ठेवण्यात आलेल्या बेसप्राईज रुपयात ईशांतला पंजाब संघाने खरेदी केली आहे. पंजाबचा संघाचा मुख्य प्रशिक्षक वीरेंद्र सेहवागने ट्विट करत ईशांत शर्माचे स्वागत केले आहे. वेलकम बुर्ज खलिफा असे म्हणत त्याने ईशांत शर्माचे स्वगत केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, किंग्ज इलेव्हन पंजाबच्या महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत झाली आहे. त्याची भरपाई म्हणून फ्रॅन्चाईजीने ईशांत शर्माशी संपर्क साधला आणि दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. सध्या किंग्ज इलेवन पंजाबचा संघ मुख्य प्रशिक्षक वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्त्वात इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये सराव करत आहे. किंग्ज इलेवन पंजाबमध्ये एकूण 27 खेळाडू असून त्यात 18 भारतीय आणि 9 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
आयपीएल लिलावात ईशांत शर्मा आणि इरफान पठाणला कोणत्याही संघाने खरेदी केलं नव्हतं. या दोन्हीं खेळाडूंनी मागच्या मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्सचं नेतृत्त्व केलं होतं. ईशांत शर्मा पुण्याकडून केवळ दोनच सामन्यात खेळला होता. दुखापतीनंतर तो पुढील सामने खेळू शकला नव्हता. यानंतरही त्याने स्वत:ची बेस प्राईज दोन कोटी ठेवली होती. परिणामी लिलावात त्याचं मोठं नुकसान झालं होतं.
Welcoming the Hairy&Slightly distorted Burj Khalifa @ImIshant to the @lionsdenkxip family.Plz Welcome him by making such a face wherever u r pic.twitter.com/zThZP8IUdW
— Virender Sehwag (@virendersehwag) April 4, 2017