IPL : दुखापतग्रस्त मलिंगाच्या जागी जेरॉम टेलरची वर्णी
By admin | Published: April 27, 2016 06:23 PM2016-04-27T18:23:26+5:302016-04-27T18:29:26+5:30
लसिथ मलिंगा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या नवव्या सत्रातून बाहेर गेला आहे, त्याच्या जागी वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज जेरॉम टेलरची वर्णी लागली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - T20 स्पेशालिस्ट आणि चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या नवव्या सत्रातून बाहेर गेला आहे, त्याच्या जागी वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज जेरॉम टेलरची वर्णी लागली आहे. दुखापतीमुळे मलिगाने टी २० विश्वचषकातून माघार घेतली होती. औपचारीक करारपत्र पुर्ण झाल्यानंतर जेरॉम मुंबई संघात दाखल होईल.
मुंबई इंडियन्सच्या वैद्यकीय पथकानं केलेल्या चाचणीत लसिथ मलिंगा अनफिट असल्याचं आढळून आलं होतं. मलिंगाच्या डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आणखी चार महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला मुंबई इंडियन्सच्या वैद्यकीय पथकाने दिला आहे. त्यामुळे मलिंगाला श्रीलंका संघाच्या इंग्लंड दौऱ्यातून आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमधूनही माघार घ्यावी लागत आहे.
#TeamUpdate: Jerome Taylor to replace the injured Lasith Malinga in the squad https://t.co/w06o4eqTtv#DilSeIndianpic.twitter.com/KJq3JAq92C
— Mumbai Indians (@mipaltan) April 27, 2016
जेरॉम टेलरने IPL मध्ये पंजाब आणि पुणे संघाचे नेतृत्व केले आहे. २०११ मध्ये त्याने पुणे संघाकडून खएळलेल्या ५ सामन्यात ८ च्या सरासरीने ६ विकेट घेतल्या होत्या. आतंराष्ट्रीय T20 च्या ६१ सामन्यात ७.८च्या सरासरीने ७४ विकेट घेतल्या आहेत. २०१६च्या टी २० विश्नचषकात वेस्ट इंडिजच्या १५ सदसीय संघात होता.