‘आयोजनापूर्वी मिळणार आयपीएल सामना शुल्क’
By admin | Published: March 31, 2017 12:45 AM2017-03-31T00:45:56+5:302017-03-31T00:45:56+5:30
आयपीएलच्या दहाव्या पर्वाचे आयोजन ५ एप्रिलपासून होत आहे. २२ मेपर्यंत एकूण दहा आयोजित स्थळी सामने
नवी दिल्ली : आयपीएलच्या दहाव्या पर्वाचे आयोजन ५ एप्रिलपासून होत आहे. २२ मेपर्यंत एकूण दहा आयोजित स्थळी सामने खेळविले जातील. यातील प्रत्येक सामन्यासाठी ६० लाख रुपये सामन्याआधी देण्यास प्रशासकांच्या समितीने निश्चित केले आहे.
आयोजन स्थळ असलेल्या संघटनेला आयपीएल फ्रँचायजी ३० लाख तर बीसीसीआय ३० लाख देते. ही रक्कम एकाचवेळी देण्यात यावी, यावर सीओए आणि बीसीसीआयने सहमती दर्शविली. सीओएने बुधवारी दहा राज्य संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने आपला हिस्सा सामन्याआधीच द्यावा, असे निर्देश दिले.
दिल्ली, कर्नाटक, मुंबई, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश, हैदराबाद, सौराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे प्रतिनिधी सीओएला भेटले होते. या निर्णयानंतर कोलकाता, दिल्ली आणि बेंगळुरूयांना ४ कोटी २० लाख दिले जातील. कानपूरमध्ये दोन सामन्यांचे आयोजन होणार असल्याने यूपीसीएला १ कोटी २० लाख मिळतील. (वृत्तसंस्था)