आयपीएल वेळापत्रकाचा लोढा समितीशी संबंध नाही : शुक्ला
By Admin | Published: February 7, 2016 03:22 AM2016-02-07T03:22:15+5:302016-02-07T03:22:15+5:30
क्रिकेटमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या माजी सरन्यायाधीश आर.एन. लोढा यांच्या समितीने बीसीसीआयच्या दोन स्पर्धांमध्ये किमान
बेंगळुरू : क्रिकेटमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या माजी सरन्यायाधीश आर.एन. लोढा यांच्या समितीने बीसीसीआयच्या दोन स्पर्धांमध्ये किमान १५ दिवसांचे अंतर असावे, अशी अट घातली आहे. या शिफारशींचा आयपीएल वेळापत्रकाशी संबंध नसल्याची स्पष्टोक्ती आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला यांनी शनिवारी दिली.
आयपीएल वेळापत्रकानुसार यंदा ९ एप्रिलला सुरुवात होईल. पण त्याआधी भारताने ३ एप्रिल रोजी विश्व टी-२० स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यास लोढा समितीच्या शिफारशींचे उल्लंघन ठरेल. (वृत्तसंस्था)