उद्यापासून रंगणार IPL- 10 चा रणसंग्राम
By admin | Published: April 4, 2017 05:15 PM2017-04-04T17:15:16+5:302017-04-04T17:32:43+5:30
बीसीसीआयने आयपीएल 2017 चे टाईमटेबल जाहीर केले असून यावर्षी ही स्पर्धा 47 दिवसांची असणार आहे. दहाव्या मोसमाचं उदघाटन उद्या हैदराबादमध्ये होणार आहे
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - बीसीसीआयने आयपीएल 2017 चे टाईमटेबल जाहीर केले असून यावर्षी ही स्पर्धा 47 दिवसांची असणार आहे. दहाव्या मोसमाचं उदघाटन उद्या हैदराबादमध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये आठ संघाचा समावेश आहे. उद्या होणाऱ्या उद्धाटन सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांचा खास परफॉर्मन्स असणार आहे. यामध्ये प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोन,एमी जॅक्सन, हृतिक रोशन आणि शाहरुख खान आपला जलवा दाखवणार आहेत. सहा तारखेला पुण्यात रंगणाऱ्या सामन्यापूर्वी रितेश देशमुख परफॉर्मन्स करणार आहे. राजकोट येथे होणाऱ्या सामन्यापुर्वी टायगर श्रॉफ आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे. पहिल्या दिवशी हैदराबाद आणि बंगलोर यांच्यात लढत होणार आहे. 21 मे रोजी अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
IPL 10 ची काही वैशिष्ट्ये
- ही स्पर्धा 47 दिवस चालणार असून 10 वेगवेगळ्या मैदानावर सामने खेळवले जाणार आहेत.
-प्रत्येक संघ 14 सामने खेळणार असून यापैकी 7 सामने संघाच्या होम ग्राऊंडवर खेळले जातील.
- 2011 नंतर पहिल्यांदाच इंदूरमध्ये आयपीएल सामने होणार आहेत.
- आयपीएल 10 चा पहिला क्वालीफाय सामना मुंबई आणि दुसरा क्वालीफाय सामना हा बंगळूरमध्ये खेळला जाईल.
-आयपीएल 10 चा एलिमिनेटर सामना हा बंगळूर येथील चिन्नास्वामी स्टेडिअम मध्ये खेळला जाईल.
-आयपीएल 10 चा अंतिम सामना हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये 21 मे ला खेळाला जाणार आहे.
-आयपीएल 10 मध्ये टॉप 4 टिममध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशनमध्ये असलेली टिम सर्वात अगोदर क्वालिफाय सामना खेळणार.
-तीसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेली टिम एलिमिनटेर सामना खेळणार.
-पहिल्या क्वालिफायमध्ये हरणारी टीम दुसऱ्या क्वालिफायमध्ये एलिमिनेटर मॅचच्या विजेता टीमसोबत खेळणार.
- या दोघांमध्ये जो संघ जिंकेल, तो पहिला क्वालीफायर जिंकणाऱ्या टीमसोबत फायनल लढेल.
संघ आणि कर्णधार
- मुंबई - रोहित शर्मा (भारतीय खेळाडू 18 , परदेशी खेळाडू 9)
- पुणे - स्टीव्ह स्मिथ (भारतीय खेळाडू 16 , परदेशी खेळाडू 8 )
- बंगळुरु - विराट कोहली (भारतीय खेळाडू15 , परदेशी खेळाडू 9 )
- गुजरात - सुरेश रैना (भारतीय खेळाडू 19, परदेशी खेळाडू 8 )
- हैदराबाद - डेव्हिड वार्नर (भारतीय खेळाडू 16 , परदेशी खेळाडू 9 )
- पंजाब - ग्लेन मॅक्सवेल (भारतीय खेळाडू 18 , परदेशी खेळाडू 9 )
- कोलकाता - गौतम गंभीर (भारतीय खेळाडू14 , परदेशी खेळाडू 9 )
- दिल्ली - झहीर खान (भारतीय खेळाडू 17 , परदेशी खेळाडू 9)
आयपीएल 10 चे वेळापत्रक
- मॅच 1 : SRH vs RCB, 5 एप्रिल 2017, रात्री 8 वा. ( भारतीय वेळेनुसार)
- मॅच 2 : RPS vs MI, 6 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 3 : GL vs KKR, 7 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 4 : KXIP vs RPS, 8 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
- मॅच 5 : RCB vs DD, 8 एप्रिल 2017,रात्री 8 वा.
- मॅच 6 : SRH vs GL, 9 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
- मॅच 7 : MI vs KKR, 9 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 8 : KXIP vs RCB, 10 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 9 : RPS vs DD, 11 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 10 : MM vs SRH, 12 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 11 : KKR vs KXIP, 13 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 12 : RCB vs MI, 14 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
- मॅच 13 : GL vs RPS, 14 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 14 : KKR vs SRH, 15 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
- मॅच 15 : DD vs KXIP, 15 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 16 : MI vs GL, 16 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
- मॅच 17 : RCB vs RPS, 16 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 18 : DD vs KKR, 17 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
- मॅच 19 : SRH vs KXIP, 17 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 20 : GL vs RCB, 18 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 21 : SRH vs DD, 19 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 22 : KXIP vs MI, 20 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 23 : KKR vs GL, 21 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 24 : DD vs MI, 22 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
- मॅच 25 : RPS vs SRH, 22 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 26 : GL vs KXIP, 23 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
- मॅच 27 : KKR vs RCB, 23 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 28 : MI vs RPS, 24 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 29 : RCB vs SRH, 25 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 30 : RPS vs KKR, 26 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 31 : RCB vs GL, 27 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 32 : KKR vs DD, 28 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
- मॅच 33 : KXIP vs SRH, 28 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 34 : RPS vs RCB, 29 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
- मॅच 35 : Gl vs MI, 29 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 36 : KXIP vs DD, 30 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
- मॅच 37 : SRH vs KKR, 30 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
- मॅच 38 : MI vs RCB, 1 मे 2017, रात्री 4 वा.
- मॅच 39 : RPS vs GL, 1 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 40 : DD vs SRH, 2 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 41 : KKR vs RPS, 3 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 42 : DD vs GL, 4 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 43 : RCB vs KXIP, 5 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 44 : SRH vs RPS, 6 मे 2017, रात्री 4 वा.
- मॅच 45 : MI vs DD, 6 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 46 : RCB vs KKR, 7 मे 2017, रात्री 4 वा.
- मॅच 47 : KXIP vs GL, 7 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 48 : SRH vs MI, 8 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 49 : KXIP vs KKR, 9 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 50 : GL vs DD, 10 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 51 : MI vs KXIP, 11 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 52 : DD vs RPS, 12 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 53 : GL vs SRH, 13 मे 2017, रात्री 4 वा.
- मॅच 54 : KKR vs MI, 13 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 55 : RPS vs KXIP, 14 मे 2017, रात्री 8 वा.
- मॅच 56 : DD vs RCB, 15 मे 2017, रात्री 8 वा.
- पहिली क्वालिफायर : 16 मे 2017, रात्री 8 वा.
- एलिमिनेटर : 17 मे 2017, रात्री 8 वा.
- दुसरी क्वालिफायर : 19 मे 2017, रात्री 8 वा.
- फायनल : 21 मे 2017, रात्री 8 वा.