IPL - विराट कोहली बाहेर? या खेळाडूकडे RCBचे नेतृत्व

By Admin | Published: March 31, 2017 02:23 PM2017-03-31T14:23:22+5:302017-03-31T14:26:45+5:30

कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीतून अद्याप सावरला नाही. त्यामुळे आयपीएलच्या दहाव्या सत्रातील सुरुवातीच्या काही सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे.

IPL - Virat Kohli out? This player led by RCB | IPL - विराट कोहली बाहेर? या खेळाडूकडे RCBचे नेतृत्व

IPL - विराट कोहली बाहेर? या खेळाडूकडे RCBचे नेतृत्व

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटीत झालेल्या दुखापतीनंतर विराट कोहलीने धर्मशाला कसोटीतून माघार घेतली होती. कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीतून अद्याप सावरला नाही. त्यामुळे आयपीएलच्या दहाव्या सत्रातील सुरुवातीच्या काही सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत एबी डीव्हिलियर्स संघाचे नेतृत्त्व करणार आहे. येत्या 5 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला सामना हैदराबाद सनरायझर्सविरुद्ध खेळविण्यात येणार आहे.
कोहलीच्या दुखापतीवर सध्या उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सुरूवातीचे काही सामन्यांना कोहलीला विश्रांती देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. विराट कोहलीच्या जागेवर सर्फराज खान किंवा मनदीप सिंगला अंतिम 11 मध्ये स्थान देण्याची शक्यता आहे.
 
विराट म्हणजे क्रिकेटमधला डोनाल्ड ट्रम्प 
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने मागितली माफी 
ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत मैत्री शक्य नाही - विराट कोहली
 
2 एप्रिल रोजी डीव्हिलियर्स भारतात येणार आहे. सध्याची परिस्थीती पाहता तो आरसीबीचे नेतृत्व करु शकतो. संघ व्यवस्थापकाकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नाही. पण आरसीबीकडे शेन वॅटसन आणि डीव्हिलियर्स सारखे पर्याय आहेत. जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीमुळे बीसीसीआय विराट कोहलीला आराम करायला सांगू शकते. त्याची दुखापत पूर्णपणे ठीक होत नाही तो पर्यंत तो संघाबाहेरच राहू शकतो.
(पराभवानंतर स्मिथची अजिंक्य रहाणेला "बिअर" ऑफर) 
(...म्हणून स्टिव्ह स्मिथवर भडकला विराट कोहली)

 

Web Title: IPL - Virat Kohli out? This player led by RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.